27 C
Mumbai
Wednesday, March 19, 2025
घरक्राईमनामानागपूर हिंसाचार: पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत ८० जणांना घेतलं ताब्यात

नागपूर हिंसाचार: पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत ८० जणांना घेतलं ताब्यात

आक्षेपार्ह माहिती पसरवणारी ५५ सोशल मीडिया अकाऊंट रडारवर

Google News Follow

Related

औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा सध्या राज्यात पेटला असून याचे पडसाद सोमवारी नागपूरमध्ये उमटल्याचे पाहायला मिअलाले. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला आणि सोमवारी रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. नागपूरच्या महाल परिसरात हा राडा झाला. हा हाणामारीला हिंसक वळण मिळाले आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. यात काही पोलीस जखमी झाले.

नागपुरातील महाल भागात सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले होते पण त्यानंतर संध्याकाळी बाहेरून काही लोक इथे आल्याचा दावा करण्यात येत असून त्यांनी दगडफेक आणि जाळपोळ करत वातावरण चिघळवल्याचे म्हटले जात आहे. या हिंसक घटनेनंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून कारवाई केली जात आहे. माहितीनुसार, पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास ८० जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे. तर, आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी ५५ सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास १८०० सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

संपूर्ण शहरात सध्या तणाव असून ज्या परिसरामध्ये ही दगडफेक झाली होती तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री हिंसा उसळल्यानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. सध्या नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शांततेचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आपण सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख दुखाःत सहभागी होणारे शहर आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन त्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई हल्ला

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात बाहेरून आलेल्या लोकांनी घातला राडा; पोलिसांवर दगडफेक, वाहनांची जाळपोळ

गौण खनीज त्याच भूखंडावर वापरण्यासाठी रॉयल्टी माफ

आरएसएस संस्कार देणारी संघटना

प्रकरण काय?

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपुरात सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. संध्याकाळी या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. दोन गटांमध्ये राडा झाला आणि नागपुरातील महाल परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले. उधे एकमेकांवर दगडफेक सुरू झाली आणि वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक झाली. त्यात अनेक पोलीस जखमी झाले असून फायर ब्रिगेडचे चार जवानही जखमी झाले आहेत. समाजकंटकांनी यावेळी रस्त्यावरील दिसेल ती गाडी फोडण्यास सुरुवात केली. चारचाकी आणि दुचाकी वाहने पेटवण्यात आली. सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा