विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर हरियाणामध्ये भाजपाची विजयी घौडदौड अजूनही सुरूचं आहे. हरियाणामध्ये पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत भाजपाच्या महापौरपदाच्या उमेदवारांनी १० पैकी नऊ महानगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला या निवडणुकीत साधे खातेही उघडता आलेले नाही. भाजपाने काँग्रेसचे दिग्गज नेते भूपिंदर हुड्डा यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहतकमध्येही विजय मिळवला आहे.
हरियाणामधील १० पैकी नऊ महानगरपालिकांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे. यामुळे आता हरियाणामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या महापौरपदाच्या उमेदवारांनी अंबाला, गुरुग्राम, सोनीपत, रोहतक, कर्नाल, फरिदाबाद, पानिपत, हिस्सार आणि यमुनानगर जिंकले आहेत. मानेसरमध्ये अपक्ष उमेदवार इंद्रजीत यादव यांनी भाजपच्या सुंदर लाल यांचा पराभव केला.
अंबालामध्ये, भाजपाच्या शैलजा सचदेवा यांनी महापौरपद जिंकले, त्यांनी काँग्रेस प्रतिस्पर्धी अमिषा चावला यांचा २०,४८७ मतांनी पराभव केला. तर गुरुग्रामच्या महापौरपदाची जागा भाजपाच्या राज राणी यांनी १,७९,४८५ मतांनी जिंकली. सोनीपतमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते राजीव जैन यांनी काँग्रेसच्या कोमल दिवाण यांचा पराभव केला. कर्नालमध्ये भाजपाच्या रेणू बाला गुप्ता यांनी काँग्रेसचे मनोज वाधवा यांचा पराभव केला. माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहतकमध्येही काँग्रेसला पराभव पाहावा लागला. रोहतकमध्ये भाजपाचे राम अवतार यांनी काँग्रेसचे सूरजमल किलोई यांच्याविरुद्ध विजय मिळवला.
हे ही वाचा :
संभलमधील जामा मशिदीसह १० मशिदी होळीनिमित्त ताडपत्रीने झाकणार
महू हिंसाचार: आठ गुन्हे दाखल, ५० जण आरोपी म्हणून घोषित तर १० जणांची रवानगी तुरुंगात
संभलचे सीओ अनुज चौधरी यांच्याविरुद्ध वादग्रस्त पोस्ट प्रकरणी अबाज खानला अटक!
दिल्लीमधून २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक
फरिदाबादमधून भाजपाचे प्रवीण जोशी, हिसारमधून प्रवीण पोपली, कर्नालमधून रेणुबाला गुप्ता, पानीपतमधून कोमल सैनी, रोहतकमधून राम अवतार वाल्मिकी, यमुना नगरमधून सुमन बहमणी, सोनीपतमधून राजीव जैन, अंबालामधून सलदा सचदेवा आणि गुरुग्राम महानगरपालिकेत महापौरपदी राजराणी मल्होत्रा विजयी झाल्या आहेत. या विजयाबद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी जनतेचे आभार मानले आहेत आणि म्हटले आहे की, ट्रिपल इंजिन सरकार जनतेचा विकास करेल. विशेष म्हणजे हरियाणातील १० पैकी सात महानगरपालिकांमध्ये महिला महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. फक्त तीन महानगरपालिकांमध्ये पुरुष महापौर निवडून आले आहेत.