बंगालमध्ये निवडणुकांनंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेक भाजपा कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. त्यावरून देशात संताप उसळलेला आहे. अशावेळेस बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना सामना या मुखपत्रातून थेट पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याशी करण्यात आली. यावरून होळकरांचे विद्यमान वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्यात होळकरांनी संजय राऊतांची वैचारिक पातळी लक्षात आल्याची जहाल टीका केली आहे.
आपल्या पत्रातून होळकरांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. होळकरांनी राजकीय चिखलफेकीसाठी राष्ट्रपुरूषांचा वापर करू नये असे देखील सुनावले आहे. याबरोबरच आजच्या नेते मंडळींशी राष्ट्रपुरूषांची तुलना करू नये असे खडे बोल त्यांनी सुनावले आहेत.
हे ही वाचा :
सोनियांचे चरणचाटण उपयोगी पडलेले दिसत नाही- अतुल भातखळकर
ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमारचा शोध घेण्यासाठी ‘लूकआऊट’ नोटीस
निर्मला सीतारामन यांचे ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर
मुंबई – कानपूर दरम्यान सुपरफास्ट विशेष ट्रेन्स
यावेळी त्यांनी रयतेचे कल्याण मानून काम करणाऱ्या अहिल्या बाई होळकरांची तुलना संपुर्ण देशातील कोणत्याही एका नेत्याशी होऊच शकत नसल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांनी अहिल्याबाईंचे विचार आचरणात आणा, त्यांच्यासारखा रयतेचा सांभाळ करा मग जनताच ठरवेल आपण त्या योग्यतेचे आहात की नाही. असे देखील त्यांनी सुनावले आहे.
अशा कठोर शब्दांत त्यांनी संजय राऊतांच्या लेखावर टीका केली आहे.