31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणठाकरे सरकार कोविडची आकडेवारी लपवतंय- प्रवीण दरेकर

ठाकरे सरकार कोविडची आकडेवारी लपवतंय- प्रवीण दरेकर

Google News Follow

Related

मुंबईतील कोरोना मृत्यूची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचं अभासी चित्र उभं करणं, असं घडत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केलीय. त्यावरुन आता प्रवीण दरेकर यांनीही मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्याला उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र, उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महापालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे. त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेनं दिला, अशा शब्दात दरेकरांनी जोरदार टोला हाणलाय.

“आरटीपीसीआर चाचण्या केल्यानंतर संसर्ग दर २३.४३ टक्के पर्यंत कसा गेला, हे मान्य करता मग मासिक संसर्ग दर मार्चमध्ये वाढून ११.२३ टक्के आणि एप्रिलमध्ये १८.०६ टक्के पर्यंत गेला, ही माहिती का लपवून ठेवता? मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे? आरटीपीसीआर चाचण्या कमी करून संसर्ग दर कमी दाखविले जात असल्यासंदर्भात तसेच कोविड-१९ मुळे झालेले मृत्यू अन्य कारणांमुळे झाले असल्याची नोंद होत आहे, देवेंद्रजी फडणवीस यांनी ही अनियमितता आपल्या पत्रात तारखा, उदाहरणांसह उघड केली. त्याला मोघम उत्तर देत मुंबई महापालिकेनं आणखी संशय वाढवला”, असं ट्वीट दरेकरांनी केलंय.

हे ही वाचा:

न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही: केंद्र सरकार

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांवर आकसातून गुन्हा?

नरी कॉन्ट्रॅक्टर यांनाही लसीकरणाच्या अव्यवस्थेचा बसला फटका

युरेनियम चोरी प्रकरणात एनआयएची एन्ट्री

मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होतेय. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा