प्रशासनातील गोंधळाचा नागरिकांना मानसिक त्रास
एकीकडे लसीकरण केंद्रावर लसी नाहीत असे जाहीर करायचे आणि त्याच नागरिकांना लस दिल्याचे प्रमाणपत्रही द्यायचे…असा काहीसा उद्वेगजनक अनुभव लोकांना येऊ लागला आहे. मुंबईतल्या कामा रुग्णालयात शुक्रवारी काही ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी रांग लावली. पण लस संपल्याचे कारण देत त्यांना घरी पाठविण्यात आले. निराश झालेल्या या ज्येष्ठ नागरिकांना घरी आल्यावर मात्र धक्का बसला तो लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर. त्यामुळे लसींचा साठा संपला असला तरी अशा प्रमाणपत्रांचा साठा मात्र मुबलक आहे की काय, अशी शंका घ्यायला वाव आहे.
हे ही वाचा:
स्वतःच्या मुलाला मंत्री केलंत, तसंच आता बहुजनांच्या मुलांच्या नियुक्त्या करा
सावरकर म्हणाले, हा प्रश्न म्हणजे दुसऱ्या बाजीरावानंतर कोण या प्रश्नासारखा वाटतो!
पाक समर्थक इम्रान खानला अमेठीत अटक
भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान
डॅनिएल सिक्वेरा यांच्या कुटुंबियांना या अनुभवातून जावे लागले. ते म्हणतात की, शुक्रवारी १२ ते १ या कालावधीत माझ्या पालकांना लसीकरणासाठी कामा मध्ये बोलावण्यात आले होते. १२ वाजता आम्ही लसीकरण केंद्रावर पोहोचल्यावर आम्हाला सांगण्यात आले की, लसींचा साठा संपला आहे. त्यामुळे आम्ही घरी परतलो. संध्याकाळी ६.२३ वाजता माझ्या वडिलांना मोबाईलवर मेसेज आला की, त्यांचे लसीकरण झालेले आहे. शिवाय, त्याचे प्रमाणपत्रही मिळाले. डॅनियल यांचे वडील केविन (७४) आणि आई जेसिंटा (७०) हे कोविन अपवर कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोससाठी नोंदणी केली होती.
डॅनियल म्हणाला की, आम्ही लसीकरण केल्याच्या मेसेजबद्दल विचारणा केली तेव्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले की, तांत्रिक चुकीमुळे तसे झाले असेल. पण प्रश्न होता की, प्रमाणपत्र कसे काय देण्यात आले? त्यानंतर माझ्या आईवडिलांना शनिवारी येण्यास सांगण्यात आले. पण शनिवारी कोणताही मेसेज आला नाही. तेव्हा मंगळवारी लस देण्यात येईल असे सांगण्यात आले.
अगदी असाच अनुभव योहान लुईस यांच्या आईबाबतही आला. योहान यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी त्यात म्हटले होते की, शुक्रवारसाठी मी माझ्या आईच्या नावाची नोंदणी केली. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान लस देण्यात येणार होती. पण १२च्या आधीच लस संपल्याचे कळले. पण संध्याकाळी आम्हाला मेसेज आला की, आई एलिझाबेथचे लसीकरण झाले आहे. कोविन अपवरून प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासही सांगण्यात आले होते. तिथेही आईने लस घेतल्याचेच नमूद केले होते.
अंकिता सिंग यांनी आईवडिलांच्या लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यांचा दुसरा डोस होता. त्यांनाही असाच अनुभव आला.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या या संपूर्ण वृत्तासंदर्भात कामा रुग्णालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.