एन.रंगासामी यांनी पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुखमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अखिल भारतीय एन.आर काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष एन.रंगासामी हे पुदुचेरीचे नवे मुख्यमंत्री असतील. या शपथविधी सोहळ्यात रंगासामी यांनी एकट्यानेच शपथ घेतली असून त्यांच्या मंत्रिमंडळात नेमके कोणते चेहरे असतील ती नावे गुलदस्त्यात आहेत.
शुक्रवार, ७ मे रोजी दुपारी रंगासामी यांचा शपथविधी सोहळा पार पडला. अतिशय छोटेखानी आणि औपचारिक पद्धतीचा हा सोहळा होता. पुदुचेरी येथील राजनिवासात हा शपथविधी समारंभ झाला. यावेळी पुदुचेरीच्या नायब राज्यपाल तमिलीसाई सौंदराराजन यांनी रामासामी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. रंगासामी यांनी चौथ्यांदा पुदुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. लवकरच ते आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा करणार असून त्या नंतर या मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल.
हे ही वाचा:
मोदींनी पुन्हा घेतली कोरोनाची आढावा बैठक
अत्यावश्यक सेवेपलीकडील लोकांना नोंदणीशिवाय लस नाही!
लसीच्या दुसऱ्या डोसला विलंब होतोय?……चिंता नसावी!!
शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर
दरम्यान रंगासामी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “मी एन. रंगासामी यांनी पुदुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यकाळास शुभेच्छा देतो.” असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
I would like to congratulate Shri N.Rangasamy Ji on taking oath as Puducherry CM. Best wishes for the tenure ahead.
— Narendra Modi (@narendramodi) May 7, 2021
नुकत्याच पार पडलेल्या पुदुचेरी विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला साधे बहुमत मिळाले. ३० जागा असलेल्या पुदुचेरी विधानसभेत एनडीए घटक पक्षांचे १६ उमेदवार विजयी झाले आहेत. यात रामासामी यांच्या अखिल भारतीय एन.आर काँग्रेस पक्षाने १६ जागी निवडणूक लढवून त्यांचे १० आमदार निवडून आले तर भारतीय जनता पक्षाचे ९ पैकी ६ उमेदवार विजयी झाले. एआयडीएमके पक्षाने ५ ठिकाणी निवडणूक लढवली होती पण त्यांना आपले खाते उघडता आले नाही.