भाजपा नेते भातखळकर यांनी विचारला सवाल
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली असताना आणि त्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारला पैशांची चणचण भासत असताना मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी अतिरिक्त ३०० कोटींचा खर्च करण्याचे ठरविल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात याच पुनर्बांधणीसाठी ६०० कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. तिथे ठाकरे सरकारने त्यात ३०० कोटींची वाढ करून हे कंत्राट ९०० कोटींवर नेऊन ठेवले आहे.
भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ठाकरे सरकारला खडसावून विचारले आहे. भातखळकर यांनी म्हटले आहे की, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे कंत्राट ६०० कोटींवरून थेट ९०० कोटींवर गेले आहे हा ३०० कोटींचा घपला कुणाचा आहे? मुख्यमंत्र्यांना माझे हे सांगणे आहे की, त्यांनी याची चौकशी करावी. काँग्रेसचे नेते सेंट्रल विस्टा प्रकल्पावर आक्षेप घेत आहेत. महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.
हे ही वाचा:
मोदींनी पुन्हा घेतली कोरोनाची आढावा बैठक
मुंबईत लवकरच १४ ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु
शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर
मग आमदार निवासावर पुनर्बांधणीचे कंत्राट अव्वाच्या सव्वा रकमेने आणि एवढ्या तातडीने देण्याचे कारण काय? यासंदर्भात प्रतिक्रिया देणारे आर्किटेक्ट शशी प्रभू कोण? ते सरकारचे प्रवक्ते आहेत का? ही निविदा ताबडतोब रद्द करा, अन्यथा मी चीफ व्हिजिलन्स कमिशनरकडे यासंदर्भात तक्रार करीन असे मी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे आणि भाजपा याविरोधात मोठे आंदोलन उभे करेल.