28 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
घरविशेषइस्रोची ऐतिहासिक कामगिरी; दोन उपग्रह अंतराळात जोडले

इस्रोची ऐतिहासिक कामगिरी; दोन उपग्रह अंतराळात जोडले

अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत ठरला चौथा देश

Google News Follow

Related

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने गुरुवारी पुन्हा एकदा इतिहास रचत जगाला भारताच्या अंतराळ मोहिमांची दखल घेण्यास भाग पाडले आहे. इस्रोने स्पेडेक्स (स्पेस डॉकिंग एक्सरसाइज) मोहिमेअंतर्गत दोन उपग्रहांना यशस्वीरित्या अंतराळात डॉक करण्याची (दोन उपग्रह अवकाशात गतिमान असताना एकत्र जोडणे) प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरला आहे.

इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यासंदर्भात माहिती दिली आहे. इस्रोने म्हटले आहे की, “भारताने अंतराळ इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. इस्रोच्या स्पेडेक्स मिशनला ‘डॉकिंग’मध्ये ऐतिहासिक यश मिळाले आहे. या क्षणाचे साक्षीदार असल्याचा अभिमान वाटतो.”

यापूर्वी इस्रोने दोनदा डॉकिंगचा प्रयत्न केला होता, मात्र तांत्रिक अडचणींमुळे ७ आणि ९ जानेवारीला ते शक्य झाले नाही. अखेर १२ जानेवारी रोजी इस्रोला हा उपग्रह १५ मीटर आणि ३ मीटर अंतरावर आणण्यात यश आले होते. इस्रोने सांगितले होते की, “१५ मीटर आणि नंतर ३ मीटरपर्यंतचे अंतर यशस्वीरित्या पार करण्यात आले आहे. यानंतर उपग्रहांना सुरक्षित अंतरावर नेण्यात आले. डेटाचे विश्लेषण केल्यानंतर डॉकिंग प्रक्रिया पूर्ण केली जाईल.”

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इस्रोने दोन उपग्रहांची डॉकिंग प्रक्रिया यशस्वीपणे केल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, “उपग्रहांच्या अंतराळ डॉकिंगच्या यशस्वी प्रात्यक्षिकासाठी इस्रोमधील आमच्या शास्त्रज्ञांचे आणि संपूर्ण अंतराळ समुदायाचे अभिनंदन. येत्या काही वर्षांमध्ये भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे.”

स्पेडेक्स मोहीम का आहे महत्त्वाची?

स्पेडेक्स मिशन इस्रोने ३० डिसेंबर २०२४ रोजी लाँच केले होते. यामध्ये SDX01 (पाठलाग करणारा) आणि SDX02 (टार्गेट) हे दोन छोटे उपग्रह पृथ्वीच्या कमी कक्षेत पाठवण्यात आले होते. भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी डॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. आगामी चांद्रयान-४ सारख्या मोहिमांमध्ये डॉकिंग तंत्रज्ञानाची आवश्यकता असणार आहे. याशिवाय २०२८ पर्यंत प्रक्षेपित करण्यात येणारे भारताचे अंतराळ स्थानक ‘इंडियन स्पेस स्टेशन’च्या स्थापनेसाठीही हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.

या मोहिमेअंतर्गत प्रथम दोन्ही उपग्रह २० किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आले. चेझर उपग्रह नंतर टार्गेट उपग्रहाजवळ आला आणि त्याने ५ किमी, १.५ किमी, ५०० मीटर, २२५ मीटर, १५ मीटर आणि शेवटी ३ मीटर अंतर कापले. यानंतर दोन्ही उपग्रह एकमेकांशी जोडले गेले. डॉकिंगनंतर, उपग्रहांदरम्यान पॉवर ट्रान्सफर केले गेले आणि नंतर दोन्ही त्यांचे संबंधित पेलोड ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी वेगळे केले गेले.

चांद्रयान- ४ मोहिमेत डॉकिंग आणि अनडॉकिंग प्रक्रिया महत्त्वाची भूमिका बजावतील. या मिशनमध्ये, वेगवेगळ्या लॉन्च व्हेइकल्समधून दोन मॉड्यूल लॉन्च केले जातील, जे जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये डॉक होतील. चंद्रावरील नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परत आणण्यासाठी डॉकिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. याशिवाय मानवी मोहिमा आणि अंतराळ स्थानकांसाठीही हे तंत्रज्ञान वापरण्याची योजना आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा