महाकुंभ हा भारतीय सोहळा राहिलेला नसून तो आता एक जागतिक उत्सव बनला आहे. प्रयागराज येथे १३ जानेवारी पासून सुरु झालेल्या सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत आहेत. ब्राझील, जर्मनी, जपान, इंग्लंड, अमेरिका आणि स्पेन या देशांतूनही भाविक प्रयागराजला पोहोचू लागले आहेत. या घटनेमुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सनातन संस्कृतीचा वाढता प्रभाव दिसून येत आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तान आणि अरबसह इस्लामिक देशही महाकुंभात रस दाखवत आहेत. गुगल ट्रेंड्सनुसार योगी सरकारच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या महाकुंभला इस्लामिक देशांमध्ये खूप सर्च केले जात आहे. महाकुंभचा शोध घेणाऱ्या देशांची यादी पाहिली तर सर्वात आश्चर्यचकित करणारे पहिले नाव पाकिस्तानचे समोर आले आहे.
पाकिस्ताननंतर कतार, यूएई आणि बहरीन या देशांनी महाकुंभासाठी उत्सुकता दाखवली आहे. याशिवाय नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, ब्रिटन, थायलंड, अमेरिका आदी देशांतील लोकही महाकुंभाबद्दल वाचन आणि शोध घेत आहेत. महाकुंभात आंतरराष्ट्रीय यात्रेकरूंच्या वाढत्या संख्येवरून सनातन संस्कृतीचा प्रभाव झपाट्याने पसरत असल्याचे दिसून येते.
हे ही वाचा :
आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा…मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला कानमंत्र!
महाकुंभात ५ विद्या कुंभांची स्थापना
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रार्पण केलेल्या INS सुरत, INS नीलगिरी आणि INS वाघशीरमध्ये काय आहे विशेष?
छत्रपती शिवरायांनी नौसेनेला ‘नवे सामर्थ्य, व्हिजन दिले’
दरम्यान, महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी, मकरसंक्रांतीच्या दिवशी, ३.५ कोटींहून अधिक भाविकांनी अमृत स्नानादरम्यान संगमाच्या तीरावर श्रद्धेने स्नान केले. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी (१४ जानेवारी) सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.