या वर्षी महाकुंभमध्ये एक नवीन आणि अनोखे आकर्षण जोडले गेले आहे. ‘डिजिटल महाकुंभ अनुभव केंद्र’ तयार करण्यात आले आहे. जे आता सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. या ‘डिजिटल महाकुंभ अनुभव केंद्रा’मध्ये लोकांना ५ मिनिटांच्या चित्रपटाद्वारे महाकुंभाच्या इतिहासाची झलक पाहता येणार आहे.
याशिवाय संग्रहालयात असलेली विविध आकर्षक चित्रे आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून प्राचीन काळापासून स्वातंत्र्यानंतरच्या महाकुंभाच्या प्रवासाची माहिती उपलब्ध आहे. येथे दर्शकांना महाकुंभ कार्यक्रमाची सुरुवात, त्यात कालांतराने होणारे बदल आणि त्याचे महत्त्व यांचे नवीन डिजिटल दृश्य पहायला मिळते.
या केंद्रात येणारे लोक सांगतात की, त्यांना येथे एक नवा अनुभव मिळाला, जो त्यांनी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. हा उपक्रम म्हणजे महाकुंभचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा समर्पित करण्याचा एक अभिनव मार्ग आहे, ज्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना या महान उत्सवाचे महत्त्व समजण्यास मदत होईल. दरम्यान, १३ जानेवारी रोजी सुरु झालेल्या महाकुंभाचा आजचा तिसरा दिवस आहे. लाखो भाविक महाकुंभात सामील झाले आहेत. परदेशातील नागरिकांचाही यामध्ये समावेश आहे.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रार्पण केलेल्या INS सुरत, INS नीलगिरी आणि INS वाघशीरमध्ये काय आहे विशेष?
महाकुंभात ५ विद्या कुंभांची स्थापना
नुरुल बनला नारायण! पश्चिम बंगालमध्ये दोन घुसखोर बांगलादेशींना अटक!
छत्रपती शिवरायांनी नौसेनेला ‘नवे सामर्थ्य, व्हिजन दिले’