पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१५ जानेवारी) एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी आज (१५ जानेवारी) आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या दोन युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे उद्घाटन केले. यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला. नेव्हीच्या आंग्रे सभागृहात हा संवाद कार्यक्रम पार पडला.
प्रामुख्याने महायुतीच्या आमदारांकडून रीपोर्टकार्ड मागितल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण योजना, राज्य सरकारच्या योजना, तसेच जनतेजवळ कश्यापद्धतीने पोहोचताय यांसारखे अनेक प्रश्न पंतप्रधानांनी आमदारांना विचारण्यात आल्याची माहिती आहे.
हा संवाद अतिशय महत्वाचा असल्याचे सांगितले गेले. कारण या संवादाद्वारे महायुतीला बळ मिळणार आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवेळी काही ठराविक नेत्यांनाच भेटत असतात. परंतु पहिल्यांदा सरकारमधील सर्व आमदारांसोबत संवाद साधताना दिसले.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रार्पण केलेल्या INS सुरत, INS नीलगिरी आणि INS वाघशीरमध्ये काय आहे विशेष?
नुरुल बनला नारायण! पश्चिम बंगालमध्ये दोन घुसखोर बांगलादेशींना अटक!
छत्रपती शिवरायांनी नौसेनेला ‘नवे सामर्थ्य, व्हिजन दिले’
वडिलांनी ठरवलेल्या लग्नाला विरोध केल्याने तरुणीची हत्या
दरम्यान, पंतप्रधान मोदींशी संवाद साधल्यानंतर शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संवाद म्हणजे हे एका तऱ्हेने प्रबोधन होते. आम्हाला खूप चांगला अनुभव आला. पंतप्रधान मोदींनी काही खडेबोल सुनावले का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर केसरकर म्हणाले, त्यांनी खडेबोल नाहीतर सुंदर असे मार्गदर्शन केले. प्रत्येकांनी त्याची नोंद घेतली असून त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
ते पुढे म्हणाले, एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे त्यांनी मार्गदर्शन केले आणि माझी ही चौथी टर्म असून काही गोष्टी नव्याने शिकलो याचा मला आनंद आहे. लोकप्रतिनिधीनी कोणती पथ्य सार्वजनिक जीवनात पाळावी, कशा पद्धतीने जास्तीतजास्त लोकांशी संपर्क साधावा, कशा पद्धतीने आपल्या मतदार संघातील लोकांना न्याय द्यावा, याची पंतप्रधानांनी माहीती दिली. यामध्ये कोणत्याही विरोधकांचा उल्लेख केला नाही, असे केसरकर यांनी सांगितले.