देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे देशाच्या आरोग्यसुविधांवर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. त्यासाठी भारताला जगातील विविध देशांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यापैकी नेदरलँड आणि स्वित्झरलँड या देशांकडून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घेऊन येणारी विमाने भारतात दाखल झाली आहेत.
स्वित्झरलँड वरून ६०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि ५० व्हेंटिलेटर घेऊन येणारे विमान आज सकाळी भारतात पोहोचले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर यांच्यासोबत इतरही काही वैद्यकीय मदत या विमानाद्वारे भारतात पाठवली गेली आहे.
हे ही वाचा:
संगमनेरमध्ये जमावाकडून पोलिसांवर हल्ला
‘मुंबई पोलिस रश्मी शुक्लांना अटक करू शकत नाहीत’
कोविड लसींना पेटंटच्या पिंजऱ्यातून सोडवण्यास अमेरिकेचा पाठिंबा
त्यापाठोपाठ युरोपातील नेदरलँड या देशाने देखील भारताला मदत पाठवली आहे. नेदरलँडकडून भारताला ४४९ व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवले आहेत. त्याबरोबर भारताला इतर वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात आल्या आहेत.
भारत सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडला आहे. सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र कोविडच्या दुसऱ्या लाटेने भारताची आरोग्यसुविधा तिच्या कमाल क्षमतेपर्यंत ताणली आहे. त्यामुळे भारताला विविध देशांकडून वैद्यकिय सुविधांचा पुरवठा केला जात आहे. यात अनेक देशांनी ऑक्सिजन सिलेंडर, टँकर पाठवले आहेतच, शिवाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जात आहे.