27 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेषINS सुरत, INS नीलगिरी, INS वाघशीर राष्ट्राला अर्पण!

INS सुरत, INS नीलगिरी, INS वाघशीर राष्ट्राला अर्पण!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

Google News Follow

Related

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी बुधवार, १५ जानेवारी रोजी मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ या दोन युद्धनौका आणि ‘आयएनएस वाघशीर’ ही पाणबुडी राष्ट्राला अर्पण केली. यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली असून यामध्ये आत्मनिर्भर भारताचेही दर्शन घडत आहे.

या दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीची बांधणी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे करण्यात आली आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आयएनएस वाघशीर, P75 स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम पाणबुडी असून फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने बांधण्यात आली आहे. ‘हंटर-किलर’ पाणबुडी म्हणूनही ओळखली जाणारी, आयएनएस वाघशीर ही शत्रूच्या रडारवर दिसणार नसून छुप्या मोहिमा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

‘आयएनएस सुरत’ हे पी १५ बी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पाचे चौथे आणि शेवटचे जहाज आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक जहाजांपैकी एक हे जहाज आहे. यातील ७५ टक्के सामग्री ही स्वदेशी आहे. आयएनएस निलगिरी, हे पी १७ ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे. त्यात प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञान आणि अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता आहे.

हे ही वाचा:

१९७८ दंगलीत संभलमधून स्थलांतरित झालेल्या हिंदूंना जमिनी परत मिळाल्या

आता चारित्र्यवान कार्यकर्त्यांना संधी? बीडमध्ये राष्ट्रवादीत बदल

केजरीवालांची चमकती दिल्ली पहा, ‘पॅरिस सारखी दिल्ली’

बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना सायकल वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज मुंबईत आगमन झाल्यावर त्यांना नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. तसेच नौदलातील अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी ३.३० च्या सुमारास नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा