27 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेष१९७८ दंगलीत संभलमधून स्थलांतरित झालेल्या हिंदूंना जमिनी परत मिळाल्या

१९७८ दंगलीत संभलमधून स्थलांतरित झालेल्या हिंदूंना जमिनी परत मिळाल्या

प्रशासनाकडून तीन हिंदू कुटुंबांना जमिनीचा ताबा परत देण्यात आला

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधील संभल हे सध्या चांगलेच चर्चेत आले असून येथे १९७८ सालचे मंदिर सापडले. तब्बल ४६ वर्षे हे मंदिर बंद होते. यानंतर १५ डिसेंबर रोजी मंदिर उघडण्यात आले आणि तेथे पूजा करण्यात आली. माहितीनुसार, या भागातील हिंदू हे १९७८ च्या दंगलीच्या वेळी येथून बाहेर पडले होते. अनेक कुटुंबियांना हाकलण्यात आले होते. दरम्यान, संभल जिल्ह्यात १९७८ मध्ये झालेल्या दंगलीचे सत्य उघड करण्याची तयारी एकीकडे सुरू असून दंगलीतील आरोपींवर कारवाई करून पीडितांना न्याय मिळवून देण्यात येणार आहे. अशातच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संभल प्रशासनाने ताब्यात घेण्यात आलेली जमीन काही हिंदू कुटुंबियांना परत केली आहे. ‘एनडीटीव्ही इंडिया’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

संभलमध्ये १९७८ च्या दंगलीत हिंदू कुटुंबियांना या भागातून हाकलून लावण्यात आले होते आणि त्यांची जमीन इतर समाजाच्या लोकांनी ताब्यात घेतली. या ताब्यात घेतलेल्या जागेवर शाळाही बांधण्यात आली. मात्र, आता संभल प्रशासनाने कारवाई करत ताब्यात घेतलेली जमीन हिंदू कुटुंबांना परत दिली आहे. एकूण तीन हिंदू कुटुंबांना जमिनीचा ताबा परत देण्यात आला आहे. २४ नोव्हेंबरच्या हिंसाचारानंतर प्रशासनाची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे ज्यात कोट्यवधी रुपयांची जमीन प्रशासनाने हाकलून लावलेल्या हिंदूंना परत मिळवून दिली आहे. उपजिल्हा दंडाधिकारी (SDM) वंदना मिश्रा यांनी संबंधित कुटुंबांच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात केले आहेत.

हे संपूर्ण प्रकरण संभल येथील रोडवेज बसस्थानकाच्या मागे असलेल्या सुमारे दोन बिघा बागेचे आहे. या जमिनीवर एका बागेत हिंदू कुटुंब राहत होते. १९७८ च्या दंगलीत हिंदू कुटुंबांना धमकावून तेथून हाकलण्यात आले होते. याप्रकरणी या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली होती. कारवाई दरम्यान, एसडीएमला आढळून आले की दुसऱ्या समाजातील डॉक्टरांनी जमिनीवर अतिक्रमण केले आहे. शिवाय या जमिनीवर शाळा चालवली जात होती. यानंतर कारवाई करत पोलिसांनी एकूण तीन हिंदू कुटुंबांना त्यांची जमीन परत मिळवून दिली आहे.

या जमिनीचा दावा करणाऱ्यांपैकी एक अमरीश कुमार म्हणाले की, आम्ही १९७८ च्या दंगलीपर्यंत संभलमध्ये राहत होतो. माझे आजोबा तुलसीराम यांची दंगलीत हत्या झाली होती. तेव्हा आमचा जीव वाचवा म्हणून आम्ही आमची मालमत्ता सोडून येथून निघून गेलो आणि जेव्हा आम्ही परतण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमचा पाठलाग करण्यात आला. आम्ही अलीकडेच आमची मालकी सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांसह जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

तसेच आशा देवी म्हणाल्या की, आम्ही आता चंदौसीमध्ये राहतो. १९७८ च्या दंगलीनंतर आम्हाला स्थलांतर करावे लागले. येथे तीन कुटुंबे राहत होती. रस्त्याच्या मागे असलेली आमची २.२५ बिघा जमीन मुस्लिम समाजाच्या लोकांनी बळकावली आणि तिथे शाळा बांधली. ते परत मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही आम्हाला तेथून परत पाठवण्यात आले. तक्रार दाखल केल्यानंतर आज आम्हाला कळले की जमिनीचे मोजमाप केले जात आहे, म्हणूनच आम्ही येथे आलो आहोत.

हे ही वाचा : 

‘मार्शल लॉ’ची घोषणा करणाऱ्या दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक

केजारीवालांचा पाय आणखी खोलात; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी खटला चालवण्यास ईडीला परवानगी

बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना सायकल वाटप

खासगी प्रवासी वाहतूक : कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार

पोलिसांना घटनास्थळी १० हजार चौरस फूट जागा सापडली आहे. उर्वरित तीन हजार फुटांवर बुलडोझरची कारवाई होण्याची शक्यता आहे. बनावट फायर स्टेशन लिहिल्याप्रकरणी अग्निशमन विभागाने घटनास्थळी तपास सुरू केला आहे. उपजिल्हाधिकारी वंदना मिश्रा यांनी सांगितले की, “शालेय समितीने जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार आली होती. तक्रारीनंतर महसूल विभागाने सर्वेक्षण केले. जमिनीचा काही भाग अजूनही तक्रारदारांच्या मालकीचा असल्याची पुष्टी झाली. १५ हजार चौरस फूट जमिनीपैकी १० हजार चौरस फूट जमीन वैध असल्याचे आढळून आले असून, त्याचा ताबा कुटुंबांना परत करण्यात आला आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा