24 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेषपीओकेशिवाय जम्मू- काश्मीर अपूर्ण

पीओकेशिवाय जम्मू- काश्मीर अपूर्ण

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले विधान

Google News Follow

Related

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ९ व्या सशस्त्र सेना दिग्गज दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, जम्मू आणि काश्मीर पाकव्याप्त काश्मीरशिवाय अपूर्ण आहे. तसेच त्यांनी शेजारील देशाला पीओकेमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांबद्दल इशारा दिला.

राजनाथ सिंह म्हणाले की, “पीओकेशिवाय जम्मू- काश्मीर अपूर्ण आहे. पीओके हा पाकिस्तानसाठी परकीय भू भागापेक्षा अधिक काही नाही. दहशतवादाचा व्यवसाय चालवण्यासाठी पीओकेची जमीन वापरली जात आहे. पीओकेमध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवली जात आहेत. पाकिस्तानला ही शिबिरे नष्ट करावी लागतील,” असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे.

केंद्रातील लाल बहादूर शास्त्री सरकार युद्धात मिळालेल्या फायद्याचा वापर करून सीमापार दहशतवाद संपवू शकले असते. “भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६५ मध्ये अखनूर येथे युद्ध झाले. पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न हाणून पाडण्यात भारताला यश आले. १९६५ पासून पाकिस्तान अवैध घुसखोरी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. सीमापार दहशतवाद १९६५ मध्येच संपला असता, पण तत्कालीन केंद्र सरकार युद्धात मिळालेल्या फायद्याचे धोरणात्मक फायद्यात रूपांतर करू शकले नाही,” असं राजनाथ सिंह म्हणाले. भारतात घुसणारे ८० टक्क्यांहून अधिक दहशतवादी हे पाकिस्तानचे आहेत, हा मुद्दा त्यांनी बोलताना अधोरेखित केला. केंद्राच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक म्हणजे काश्मीर आणि उर्वरित देशामध्ये जे काही अंतर आहे ते भरून काढणे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या दिशेने पावले उचलत आहेत.

हे ही वाचा : 

दिल्लीतील ‘त्या’ धमकीमागे राजकीय संबंध असलेली एनजीओ

जम्मूच्या नौशेरामध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट, ६ जवान जखमी!

आतिशी यांनी तोडले आचारसंहितेचे नियम, एफआयआर दाखल

महाकुंभमध्ये सहभागी झालेला बाबा होता ‘आयआयटी इंजिनियर’

जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, “हे लोक दिग्गज आहेत ज्यांनी देशासाठी सर्वस्व दिले. ज्यांनी आपल्या भविष्याची, जीवाची चिंता न करता देशाच्या रक्षणासाठी त्याग केला. त्याची परतफेड करणे हे आमचे कर्तव्य आहे.” पुढे ते म्हणाले की, तुम्हाला योजनांतर्गत आवश्यक असलेली सर्व आर्थिक मदत कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावी. सशस्त्र सेना दिग्गजांचा दिवस १९५३ मध्ये या दिवशी सेवानिवृत्त झालेल्या सशस्त्र दलाचे पहिले कमांडर- इन- चीफ फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांच्या सेवेची दखल घेण्यासाठी दरवर्षी १४ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा २०१६ मध्ये साजरा करण्यात आला होता आणि तो दरवर्षी साजरा केला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा