24 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेषगर्दीमुळे स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी पडल्या आजारी, महाकुंभात स्नान तूर्तास नाही!

गर्दीमुळे स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी पडल्या आजारी, महाकुंभात स्नान तूर्तास नाही!

 स्वामी कैलाशानंद गिरी यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

१३ जानेवारी पासून सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्यात लाखो भाविक सहभागी झाले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. देशासह परदेशातील नागरिकांनीही कुंभमेळ्यात हजेरी लावली आहे. स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या देखील दोन दिवसांपूर्वीच प्रयागराजमध्ये दाखल झाल्या आहेत. त्या मकर संक्रांतच्या पहिल्या दिवशी पवित्र स्नान करणार होत्या.

परंतु, समोर आलेल्या बातमीनुसार त्या स्नान करणार नाहीयेत. लॉरेन पॉवेल जॉब्स आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. स्वामी कैलाशानंद गिरी यांनी याबाबत माहिती दिली. स्वामी कैलाशानंद गिरी म्हणाले, गर्दी आणि नवीन वातावरणामुळे त्यांना ऍलर्जी झाली आहे.

हे ही वाचा : 

दिल्लीतील ‘त्या’ धमकीमागे राजकीय संबंध असलेली एनजीओ

जम्मूच्या नौशेरामध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट, ६ जवान जखमी!

आतिशी यांनी तोडले आचारसंहितेचे नियम, एफआयआर दाखल

महाकुंभमध्ये सहभागी झालेला बाबा होता ‘आयआयटी इंजिनियर’

“ती माझ्या शिबिरात आहे. इतक्या गर्दीच्या ठिकाणी ती कधीच गेली नव्हती आणि तिला ऍलर्जी झाली आहे. ती अतिशय साधी आहे आणि आमच्या परंपरेचा अनुभव घेण्यासाठी ती इथे आली आहे,” असे स्वामी कैलाशानंद यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आजारी असूनही पॉवेल जॉब्सने गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमावर पवित्र स्नान करण्याच्या विधीत भाग घेण्याचा निर्धार केला आहे. स्वामी कैलाशानंद पुढे म्हणाले की, विधीत सहभागी होण्यापूर्वी ती बरे होण्यासाठी त्यांच्या शिबिरात विश्रांती घेत आहे. दरम्यान, २६ फेब्रुवारीपर्यंत हा महाकुंभ मेळा चालणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा