हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानच्या वतीने मुंबईत चार दिवसीय भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘न्यूज डंका’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.
मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेचं शनिवार, ११ जानेवारी रोजीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल हे शनिवारी या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत. गंगा आरती आणि योग साधनेने तिसऱ्या दिवशी प्रसन्न सुरुवात झाल्यानंतर १०.१५ वाजता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये कन्या वंदन कार्यक्रम पार पडणार आहे.
यानंतर गुरुपुत्र सभागृहात १०.१५ वाजता अमृतमयी गो भारती संमेलन होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा उपस्थित असणार आहेत. तर, प्रमुख पाहुणे म्हणून क्षेत्रीय गोरक्षा प्रमुख भाऊराव पूगले असणार आहेत. दुपारी २ वाजता राणी दुर्गावती मुलींचे वसतिगृह, वनवासी कल्याण आश्रम यांच्याकडून नृत्य प्रदर्शन होणार आहे. खंडेलवाल समाजाचे अध्यक्ष सीए के सी जैन, इस्कॉनचे गोरंग प्रभू, विशेष अतिथी गांधार ग्रुपचे अध्यक्ष रमेश पारीख, हिरा कंपनीचे डायाभाई सुधारिया, आयएनएनओच्या अध्यक्षा अंजना कोठारी, समाजसेवक महेश अग्रवाल हे उपस्थित असणार आहेत. सायंकाळी ५ वाजता कोण बनणार कृष्ण भक्त, ७.३० वाजता नृत्य कार्यकम होणार आहेत.
हे ही वाचा :
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती; याचं दिवशी करोडो हिंदूंची झाली होती स्वप्नपूर्ती!
श्रीराम कृपेने मिळाली सजावटीची सौंदर्यदृष्टी!
राजकीय जीवन काही लोकांच्या नशिबात असते, त्यांना काहीही करावे लागत नाही!
प्रयागराज महाकुंभात साडेतीन वर्षांचा श्रवण बाळ!
भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे आयोजन ९ ते १२ जानेवारी या कालावधीत महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प), मुंबई ४००१०४ येथे हा मेळावा भरवण्यात आला आहे. मेळाव्यासाठी सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.