बहुचर्चित असा महाकुंभ मेळावा दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना यासाठी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. देशासह जगभरातून भाविक प्रयागराजमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवार, १० जानेवारी रोजी महाकुंभ मेळाव्यानिमित्त आकाशवाणीचा भाग असलेल्या’ ‘कुंभवाणी’ या रेडिओ चॅनेलची सुरूवात केली.
या कार्यक्रमात बोलताना आदित्यनाथ म्हणाले की, “ज्यांचा सनातन धर्माबद्दल संकुचित दृष्टिकोन आहे आणि जातीच्या आधारावर भेदभाव केला जातो असा दावा करणाऱ्यांनी महाकुंभ मेळ्याचे साक्षीदार व्हावे. इथे सर्व स्तरातील लोक पवित्र संगमात स्नान करतात. महाकुंभ हा केवळ एक साधा कार्यक्रम नाही, तर तो सनातनच्या अभिमानाचे प्रतिनिधित्व करतो, हा एक मोठा मेळावा. ज्यांना सनातन धर्माच्या वैभवाचे साक्षीदार व्हायचे आहे त्यांनी या कुंभासाठी येथे यावे,” असं ते म्हणाले.
सनातन धर्माला संकुचित नजरेने पाहणाऱ्यांनी जातीच्या आधारावर इथे भेदभाव होत नाही हे पाहावे. अस्पृश्यतेची प्रथा, लिंगाच्या आधारावर भेदभाव यला इथे थारा नाही, सर्वजण संगममध्ये स्नान करण्यासाठी एकत्र येतात, असे आदित्यनाथ यांनी कार्यक्रमात अधिकारी आणि मान्यवरांना संबोधित करताना सांगितले. उद्घाटन कार्यक्रमात त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि इतर कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.
महाकुंभाच्या निमित्ताने प्रसाद भारतीने ‘कुंभवाणी’ हे चॅनेल लाँच केले आहे. महाकुंभसाठी समर्पित रेडिओ चॅनेल सुरू करण्यासाठी प्रसार भारतीने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी कौतुक केले आणि बदलत्या काळानुसार आव्हानांवर मात केली असल्याचे सांगितले. आकाशवाणी हे एकमेव माध्यम सामान्यांपर्यंत पोहोचवायचे आणि त्यांना लोकसंस्कृती आणि परंपरा पुरवायचे. मला आठवते, लहानपणी आम्ही रामचरितमानसमधील ओळी ऐकायचो ज्या आकाशवाणीने प्रसारित केल्या होत्या. काळानुसार परिस्थिती बदलली आणि लोक दृश्य माध्यमांकडे वळले. मात्र, प्रसार भारती या आव्हानांना न जुमानता, विशेषतः कनेक्टिव्हिटीच्या समस्या असलेल्या भागात टिकून राहण्यात यशस्वी झाली, असे आदित्यनाथ म्हणाले.
हेही वाचा..
बिहारच्या माजी मंत्र्यासह अनेकांवर ईडीचे छापे
हिंदू आध्यात्मिक मेळाव्यात दुसऱ्या दिवशी ‘युग नायक विवेकानंद’, आचार्य वंदन असे कार्यक्रम
माविआकडून जागावाटपात चुका झाल्यात; त्या स्वीकारल्या पाहिजेत
“राजकारणात महत्त्वाकांक्षा घेऊन नव्हे तर ध्येय घेऊन या!”
आगामी भव्य कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गुरुवारी प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ साठी मीडिया सेंटरचे उद्घाटन केले. विविध धार्मिक नेत्यांसोबत झालेल्या बैठकीबद्दल आणि तयारीचा आढावा घेतल्याबद्दल ते म्हणाले की, केवळ दोन सेक्टरची त्यांची भेट चार तासांपेक्षा जास्त काळ चालली. महाकुंभ १२ वर्षांनंतर साजरा केला जात आहे आणि या कार्यक्रमासाठी ४५ कोटी पेक्षा जास्त भाविकांची अपेक्षा आहे. महाकुंभाची सांगता २६ फेब्रुवारी रोजी होईल.