राजकारणात महत्त्वाकांक्षा घेऊन नव्हे तर ध्येय घेऊन या, असा संदेश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण पिढीला दिला आहे. नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच पॉडकास्टसारख्या माध्यमातून सर्वांसमोर येत आपले विचार मांडणार आहेत. झिरोधा या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या ‘People By WTF’ पॉडकास्ट मालिकेचाचा नव्या ट्रेलरमधून हा खुलासा झाला आहे. अनेक विषयांवर नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडत भूमिका सर्वांसमोर मांडल्याचे यातून दिसून येत आहे. यापूर्वी निखिल कामथ यांनी एक टीझर प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये निखिल कामथ पॉडकास्टवर आलेल्या एका पाहुण्याबरोबर बोलत असल्याचे दाखवले होते. मात्र, त्यामध्ये पाहुणे कोण आहे, हे दाखवले नव्हते. मात्र, आता ट्रेलरमधून पाहुणे कोण आहेत याचा खुलासा झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारणातील तरुणांचा प्रवेश, जगातील युद्ध परिस्थिती, त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधील फरक यावर मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी पॉडकास्टमध्ये सुरुवातीलाच “मी पहिल्यांदाच पॉडकास्टमध्ये सहभागी होत आहे,” असे प्रांजळपणे काबुलही केले. त्यामुळे मला माहित नाही की ते तुमच्या प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचेल, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले. राजकारणात येण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यांनी एक सल्लाही दिला. ते म्हणाले की, “लोकांनी महत्त्वाकांक्षा घेऊन नव्हे तर ध्येय घेऊन राजकारणात यावे. चांगल्या लोकांनी राजकारणात येत राहिले पाहिजे.” यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दिलेल्या भाषणाचाही उल्लेख केला, “चुका होतात. मीही चुका केल्या असतील. मी एक माणूस आहे, देव नाही,” असे ते म्हणाले. तसेच नरेंद्र मोदी यांनी पॉडकास्टमध्ये सध्या चालू असलेल्या जगातील युद्धांबाबत भारताच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणले की, “या संकट काळात, आम्ही सातत्याने सांगत आहोत की, आम्ही तटस्थ नाही. पण, शांततेच्या बाजूने आहोत.”
I hope you all enjoy this as much as we enjoyed creating it for you! https://t.co/xth1Vixohn
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2025
हे ही वाचा :
मंडलने मारली होती बंडल, ‘फातिमा शेख’ अस्तित्वातच नाही!
निज्जरच्या हत्येतील भारतीय आरोपींना जामीन
उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करावेत
‘बंद करा ती आघाडी!’ ओमर अब्दुल्लांचा इंडी आघाडीवर तोफगोळा
नरेंद्र मोदींच्या या पॉडकास्टची उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निखिल कामथ यांच्याबरोबरचा पॉडकास्ट केव्हा प्रसिद्ध होणार याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान कामथ यांच्या पॉडकास्टच्या या भागाचे नाव ‘पीपल विथ द प्राईम मिनिस्टर’ असे आहे.
निखिल कामथ हे ब्रोकिंग फर्म झेरोधा तसेच टू बीकन या कंपनीचे सह संस्थापक आहेत. याशिवाय ते रिटेल स्टॉक ब्रोकरही आहेत. कर्नाटकातील शिमोगा येथे त्यांचा जन्म झाला असून त्यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे. कंपनी सुरू करण्यापूर्वी निखिल कामथ एका कॉल सेंटरमध्ये काम करायचे.