22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामासुकमा- बिजापूर सीमेवरील जंगलात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

सुकमा- बिजापूर सीमेवरील जंगलात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाकडून आणखी शोधमोहीम सुरू

Google News Follow

Related

नक्षलग्रस्त भागात नक्षलविरोधी कारवाईला वेग आला असून छत्तीसगडमधील सुकमा- बिजापूर सीमेवरील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती आहे. या चकमकीत सुरक्षा दलाला यश आले असून यात आतापर्यंत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलाकडून आणखी शोधमोहीम सुरू असल्याची माहिती आहे.

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत चकमक झाली. सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई करत असताना सकाळी ही चकमक सुरू झाली. यानंतर तीन नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत सुरू असलेल्या चकमकीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “सुकमामध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईला यश मिळाले आहे. तिथे तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. जवळपासच्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.”

छत्तीसगडमधील दुसऱ्या एका संयुक्त कारवाईत राज्य पोलिस आणि सीआरपीएफ २२९ बटालियनने अवापल्ली पोलिस स्थानक क्षेत्रातील मुरदांडा गावात आयईडी शोधून तो निकामी केला. नक्षलवाद्यांनी रिकाम्या बिअरच्या बाटल्यांत दोन आयईडी पेरून ठेवले होते. ते शोधून काढून निकामी करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीचं छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन आयईडी स्फोटाने उडवले. या घटनेत चालक आणि आठ डीआरजी जवान हुतात्मा झाले होते. दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर येथे संयुक्त कारवाई करून हे सर्वजण परतत होते. . नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. नक्षलवाद्यांनी कुत्रू रोडवर आयईडी पेरला होता, त्याचवेळी सुरक्षा दलाचे वाहन तिथून जात असताना या आयईडीचा स्फोट झाला.

हे ही वाचा : 

आदित्य ठाकरे म्हणाले, तर आम्हीही फडणवीसांचे कौतुक करू!

१९५४च्या कुंभमेळ्यात नेहरू आले आणि चेंगराचेंगरीत १००० लोक मेले!

विधानसभा निवडणूक ‘हातचा मळ’ समजण्याची चूक केली!

अलिगडमध्ये लाऊडस्पीकर हटाव मोहीम तेजीत; ११२ ठिकाणी ‘आवाज बंद’

दुसरीकडे केंद्र सरकारनेही नक्षलवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आणण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. तेव्हापासून संपूर्ण छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील कारवाया तीव्र झाल्या आहेत. जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण २५७ नक्षलवादी मारले गेले. ८६१ पकडले गेले आणि ७८९ नक्षलवादी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परतले. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जवळपास १०० नक्षलवादी जे २०२४ मध्ये मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक आहेत गेल्या वर्षी अबुझमादमधून संपवण्यात आले. ऑक्टोबर, २०२४ रोजी, अबुझमादमध्ये तब्बल ३१ नक्षलवादी मारले गेले, हे राज्यातील नक्षलवाद्यांविरुद्धच्या सर्वात मोठ्या काउंटर ऑपरेशनपैकी एक मानले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा