22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेष१९५४च्या कुंभमेळ्यात नेहरू आले आणि चेंगराचेंगरीत १००० लोक मेले!

१९५४च्या कुंभमेळ्यात नेहरू आले आणि चेंगराचेंगरीत १००० लोक मेले!

एन एन मुखर्जी यांच्या कॅमेऱ्याने टिपली होती छायाचित्रे, भयानक इतिहास पुन्हा आला समोर

Google News Follow

Related

उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. २०२५ साली पुन्हा एकदा जानेवारी महिन्यात महाकुंभ मेळावा पार पडत असून यासंबंधीच्या तयारीसाठी उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. अद्यायावत सोयीसुविधा, चोख सुरक्षा व्यवस्था शिस्तबद्ध नियोजन यामुळे महाकुंभ २०२५ चर्चेत आहे. दरम्यान, स्वातंत्र्यानंतर आयोजित केलेल्या पहिल्या कुंभमेळ्याच्या आठवणी चर्चेत आल्या आहेत. १९५४ च्या पहिल्या कुंभ मेळाव्याला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी उपस्थिती दर्शवली होती. परंतु, त्यांचे मेळाव्यासाठीचे आगमन इतके दुर्दैवी ठरले होते की तेव्हा एक हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि तब्बल २००० हून अधिक लोक जखमी झाले होते. या दुर्दैवी घटनेला केवळ काही ‘भिकाऱ्यांचा मृत्यू झाला’ असे म्हटले गेले. मात्र, तिथे उपस्थित असणारे छायाचित्रकार एन एन मुखर्जी यांनी वास्तवाचे छायाचित्र काढल्याने काँग्रेस सरकार लपवत असलेले सत्य सर्वांसमोर आले. यासंबंधीचे ट्वीट भारतीय जनता युवा मोर्चाचे कौशंबीचे जिल्हा उपाध्यक्ष शौर्य मिश्रा यांनी केले आहे. 

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली १९५४ मध्ये काँग्रेसची सत्ता होती. तर, उत्तर प्रदेशमध्ये पहिले मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते गोविंद बल्लभ पंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यकारभार सुरू होता. प्रयागराज (तेव्हाचे अलाहाबाद) येथे स्वतंत्र भारतातील पहिल्या कुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ३ फेब्रुवारी १९५४ रोजी लाखो भाविक मौनी अमावस्या या शुभ मुहूर्तावर पवित्र स्नान करण्यासाठी संगमावर आले होते. त्याचं दिवशी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद एकाच दिवशी संगम येथे येणार होते. त्यामुळे सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी त्यांच्या आगमनाच्या बंदोबस्तात व्यस्त होते. पण उपस्थित राहण्याच्या नेहरूंच्या या निर्णयामुळे घटनास्थळी मृतदेहांचे ढीग पडले. काँग्रेस सरकाराने ही घटना दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. एक हजार लोक मारल्याच्या या घटनेला काही ‘भिकाऱ्यांचा’ मृत्यू म्हणत सरकारने प्रसिद्धीही दिली आणि वास्तव दडपण्याचा प्रयत्न केला पण आनंद विहार पत्रिकामुळे ही घटना उघडकीस आली. पुरावा म्हणून छायाचित्रही यांनी छापले. असे असतानाही ही घटना लपवण्याचा काँग्रेसवाल्यांनी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला. मात्र, या घटनेचा आणि अपघाताचा खुलासा झाल्याने हताश झालेले तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद बल्लभ पंत कमालीचे संतप्त झाले आणि त्यांनी पत्रकारासाठी अपशब्द वापरले होते.

दुर्दैवी घटना घडली तो दिवस होता ३ फेब्रुवारी १९५४. कुंभाच्या दुसऱ्या शाही स्नानाचा म्हणजेच मौनी अमावस्याचा दिवस होता. जवाहरलाल नेहरू स्वतः प्रयागला पोहोचले होते आणि राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद त्यांच्यासोबत होते. सकाळी १०.२० च्या सुमारास, पंतप्रधान नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांची गाडी त्रिवेणी रोडवरून आली आणि अडथळा पार करून किला घाटाकडे निघाली. यावेळी नेहरूंची झलक पाहण्यासाठी म्हणून लोकांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी मेळाव्यासाठी येणारी गर्दी आणि मेळाव्यातून बाहेर पडणारी गर्दी समोरासमोर आली. यातचं चेंगराचेंगरी झाली आणि लोक खंदकातून खाली पडू लागली. जवळच असलेली मोठी विहीर मृतदेहांनी भरली. आनंद विहार पत्रिकासाठी मेळ्याचे कव्हरेज करणारे छायाचित्रकार एन एन मुखर्जी यांनी १९८९ साली ‘छायाकृती’ या मासिकात प्रकाशित केलेल्या त्यांच्या आठवणींमध्ये या गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या आहेत. या जत्रेत झालेल्या अपघाताची भीषणता त्यांच्या छायाचित्रानेच समोर आली. अपघात झाला त्यावेळी ते संगम चौकीजवळील टॉवरवर उभे होते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद एकाच दिवशी संगमस्नानासाठी येणार होते, असे त्यांनी आपल्या सांगितले होते. त्यामुळे सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी त्यांच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त होते. मात्र, सकाळी १०.२० वाजता दोघेही गाडीतून किला घाटाकडे निघाले आणि गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. सर्वत्र मृतदेह पडले होते. मुखर्जी यांनी स्वतः अनेक मृतदेहांवर चढून फोटो काढले.

आश्चर्य व्यक्त करत मुखर्जी यांनी लिहिले होते की, एवढी मोठी घटना घडूनही अपघातस्थळापासून दूर असलेले उच्चपदस्थ अधिकारी दुपारी ४ वाजेपर्यंत शासकीय निवासस्थानी चहा- नाश्ता करण्यात व्यस्त होते. त्यांना या दुर्घटनेची माहितीही मिळाली नव्हती. त्याचवेळी एन एन मुखर्जी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा संपादकासह सर्व पत्रकार सहकाऱ्यांनी त्यांच्या सुखरूप परतण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि त्यांच्या आगमनाबद्दल आनंद व्यक्त केला.

दरम्यान, या दुर्घटनेचे आंतरराष्ट्रीय मथळे होऊ नये म्हणून तत्कालीन सरकारने याला ‘भिकाऱ्यांचा मृत्यू’ असे संबोधून फेटाळण्याचा प्रयत्न केला. पण एन एन मुखर्जी यांनी ती चित्रे अधिकाऱ्यांसमोर ठेवली ज्यामध्ये अनेक महिलांनी महागडे कपडे आणि दागिने घातले होते, ज्यावरून स्पष्टपणे दिसून आले की या मृत व्यक्ती भिकारी नसून ते सधन कुटुंबातील होते आणि सरकारी गैरव्यवस्थापनाला बळी पडले होते. दुर्दैव म्हणजे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह कोणालाही देण्यात आले नाहीत. त्यांचे ढीग करून सामूहिक पद्धतीने जाळण्यात आले. एन एन मुखर्जी यांनी सांगितले होते की, ते कसे तरी मृतदेहांच्या ढिगाऱ्याजवळ पोहोचले होते. पोलिस कर्मचाऱ्याचे पाय धरून त्यांनी सांगितले की त्यांना आपल्या मृत आजीला शेवटचे पहायचे आहे. त्यानंतर मुखर्जी यांना मृतदेहाजवळ जाण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, एन एन मुखर्जी यांनी एका छोट्या कॅमेऱ्याने गुपचूपपणे सामूहिक जाळलेल्या मृतदेहांचा फोटो काढला.

आनंद विहार पत्रिकाने अपघाताचे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध केले. इतरत्र फारच कमी बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे अपघाताचे चित्र कसे प्रसिद्ध झाले, याबाबत काँग्रेसच्या यंत्रणेने आश्चर्य व्यक्त केले होते. ही छायाचित्रे पाहून मुख्यमंत्री गोविंद बल्लभ पंत यांनी संताप व्यक्त करत छायाचित्रकारासाठी अपशब्द वापरले होते. एन एन मुखर्जी म्हणाले की, या मोठ्या दुर्घटनेतून धडा घेत सरकारने भविष्यातील सर्व कुंभमेळ्यांसाठी महिने आणि वर्षे आधीच व्यवस्था करण्यास सुरुवात केली होती. मात्र, या घटनेच्या वेळी जवाहरलाल नेहरूंची उपस्थिती लपवण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरूच आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य बोलले होते तेव्हा मीडिया गँग ते कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यात व्यस्त होते. ही संपूर्ण घटना लपविण्याचा प्रयत्न नेहमीच होत आहे. वस्तुस्थितीचाही विपर्यास केला जातो. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशांबी येथील जाहीर सभेत या घटनेचा उल्लेख केला होता. प्रयागराज कुंभ १९५४ ची भीषण घटना लपवण्याचा आणि दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. यानंतर पाळीव माध्यमांच्या टोळीने ताबडतोब असे साक्षीदार तयार केले गेले ज्यांचा त्या जागेशी काहीही संबंध नव्हता आणि जवाहरलाल नेहरूंची उपस्थिती लपवण्यासाठी काही गोष्टी प्रसिद्ध करण्यात आल्या.

हे ही वाचा : 

अलिगडमध्ये लाऊडस्पीकर हटाव मोहीम तेजीत; ११२ ठिकाणी ‘आवाज बंद’

लॉस एंजेलीसमधील आगडोंबामुळे १ लाख लोकांना घर सोडण्याच्या सूचना

अफगाणिस्तानला टाळी, पाकिस्तानला टपली

उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये ५७ बेकायदेशीर मदरसे; होणार कारवाई

१२ वर्षांपूर्वी ‘भास्कर’नेही या प्रकरणाचा अहवालही प्रसिद्ध केला होता, पण त्यातही नेहरूंचा सहभाग लपवलेला होता. या अपघातानंतर इंडिया एक्सप्रेसने सरकारी अधिकाऱ्यांचा हवाला देत या घटनेत केवळ ३०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसिद्ध केली होती. या दुर्घटनेत ५०० जणांचा मृत्यू झाल्याचे टाईम मासिकाने म्हटले असले तरी नेहरूंची उपस्थिती लपविण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू होते. बीबीसी हिंदीनेही अशीच एक बातमी प्रकाशित केली होती, ज्यात त्यावेळची माध्यमे खूप मोकळी होती हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण ते एन एन मुखर्जींना विसरले आणि जवाहरलाल नेहरू हे त्या अपघाताचे कारण नव्हते हे सिद्ध करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. इतकेच नाही तर घटना घडली त्यावेळी जवाहरलाल नेहरू प्रयागराजमध्ये नव्हते हे खोटे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न बीबीसीने केला. त्यांनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना यात ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यासमोर चेंगराचेंगरी झाली, असे दाखवण्याचा प्रयत्न केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा