22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरराजकारणविधानसभा निवडणूक ‘हातचा मळ’ समजण्याची चूक केली!

विधानसभा निवडणूक ‘हातचा मळ’ समजण्याची चूक केली!

शरद पवारांची कबुली

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे गाफील राहिलो, पण विरोधकांनी पराभवाच्या कारणांचा शोध घेतला, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केले आहे. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचीही कौतुक केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव नेमका कशामुळे झाला याचा आढावा घेण्यासाठी पवार गटाकडून मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या आढावा बैठकीदरम्यान शरद पवार यांनी ही कबुली दिली आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ५६ वरून थेट १० जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीला बुधवारी सुरुवात झाली. महाविकास आघाडीच्या सकाळच्या सत्रात पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे आपण गाफील राहिलो. विधानसभा निवडणुका ‘हातचा मळ’ असल्याचा समज केला. दुसरीकडे विरोधकांनी पराभवाची गांभीर्याने नोंद घेतली होती. त्यात संघाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली होती. ते घरोघरी गेले आणि त्यांनी हिंदुत्त्वाचा प्रचार केला. दोन्ही बाजू त्यांनी मतदारांना सांगितल्या. मतदारासांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्याचा परिणाम त्यांना निकालाच्या रूपात मिळाला.

“निवडणुकांचे यश १०० टक्के नसते. १९५२ च्या निवडणुकीत काँग्रेसने ९० टक्के जागा जिंकल्या होत्या. १९५७ च्या निवडणुकांवेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्याचा परिणाम झाला की, काँग्रेसच्या अनेक जिल्ह्यात शून्य तर काही जिल्ह्यात एक-दोन जागा निवडून आल्या. यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्त्व असताना असे घडले होते. आपल्यापकडे पूर्ण पाच वर्षे आहेत. आजपासून कामाला लागा,” असंही आवाहन शरद पवारांनी केले आहे.

हे ही वाचा : 

अलिगडमध्ये लाऊडस्पीकर हटाव मोहीम तेजीत; ११२ ठिकाणी ‘आवाज बंद’

लॉस एंजेलीसमधील आगडोंबामुळे १ लाख लोकांना घर सोडण्याच्या सूचना

अफगाणिस्तानला टाळी, पाकिस्तानला टपली

उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये ५७ बेकायदेशीर मदरसे; होणार कारवाई

तसेच पुढे शरद पवार म्हणाले की, “पक्ष संघटनेत ७० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. पस्तिशीच्या पुढच्या कार्यकर्त्यांनी राज्यपातळीवर काम करावे. विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पदत्याग करण्याबाबत स्वत:हून पुढे यावे; त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी आहे,” असं शरद पवारांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा