26 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त!

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त!

मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती 

Google News Follow

Related

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे. दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची अधिसूचना स्वीकारली आहे. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेखावत यांचे मंत्री सामंत यांनी आभार मानले.

मंत्री उदय सामंत म्हणाले, ३१ जानेवारी आणि १ व  २ फेब्रुवारी या दिवशी पुण्यात मराठी विश्वसंमेलनाचे उद्घाटन होत आहे. या सोहळ्याला मंत्री गजेंद्र सिंह शेखावत येणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळाच्या वतीने मी शेखावत यांचे आभार मानतो. मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी ज्या ज्या साहित्यिकांनी प्रयत्न केले त्यांचेही मंत्र्यांनी आभार मानले.

मंत्री सामंत पुढे म्हणाले, योगायोग म्हणजे ११ वर्षांपूर्वी जेव्हा मराठी भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो प्रस्ताव पाठवण्यात आला, त्यावेळी मी राज्यातील मराठी भाषेचा पहिला राज्यमंत्री होतो. तर आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात मराठी भाषेचा कॅबीनेट मंत्री झाल्यानंतर हा शासन निर्णय माझ्या हातात आला, हे माझं भाग्य आहे. आता जबाबदारी वाढलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

गुणवत्ता सिद्ध करण्याची हीच नामी संधी !

संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन

हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत हरेकर, गडेकर, कडू, जाधव यांनी मारली बाजी

भाजप मुख्यमंत्र्यांच्या घरी तरी आप नेते पंतप्रधानांच्या घरी

दरम्यान, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करून तीन महिने उलटून गेले होते. मात्र, याबाबत अधिकृत पत्र राज्य सरकारच्या हाती नव्हते. अखेर आज मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय स्वीकारला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा