आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाच्या आयुक्त राजीव कुमार यांनी केली. ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीन या सगळ्यावर देशभरातले नेते काय पद्धतीने टीका करतात त्याची उजळणी घेतली. अक्षरशः प्रत्येक मुद्दा त्यांनी खोडून काढला आणि ईव्हीएम सारख्या मशीन वरती शंका उपस्थित करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिल.