विधानसभा निवडणुकीत राज्यभरात भाजपाची लाट होती. अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यात मजबूतीने उभा असलेला वसई-विरारमधील ठाकूर कंपनीचा किल्ला या लाटेत उद्धस्त झाला. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर, त्यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर हे बाप-बेटे निवडणुकीत पराभूत झाले. दहशतीपेक्षा हिंदुत्व प्रभावी ठरले. त्याची पुनरावृत्ती महापालिकेच्या निवडणुकीत होणार काय, साम्राज्य या प्रश्नाची जोरदार चर्चा वसई-विरारमध्ये आहे.