संपूर्ण देशात कोविडने थैमान घातलेले असताना देशातील नागरीकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांच्या मते एकेकाळई दक्षिण भारतात हैदोस घालणाऱ्या N44OK हा SARS-CoV-2 चा उत्परिवर्तीत विषाणु आता कमी होत आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) मधील शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली आहे.
कोविडचा हा विषाणु कमी होत असला तरीही, कोविडच्या दुसऱ्या लाटेला हे उत्परिवर्तन जबाबदार असल्याचे मात्र तज्ज्ञांनी नाकारले आहे. त्यांच्या मते हा विषाणु मागील वर्षी दक्षिण भारतात आढळला होता.
हे ही वाचा:
केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या गाडीवर हल्ला
इस्रायलकडून भारताला वैद्यकीय मदत
राज्यात पुन्हा मराठा मोर्चे सुरु
दाभोलकर हत्त्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जमीन मंजूर
या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार N44OK हे उत्परिवर्तन नवे नाही. आम्ही हा विषाणु गेल्या वर्षी दक्षिण भारतात पाहिला होता. नव्याने झालेल्या संशोधनानुसार या विषाणुचा प्रभाव कमी होत आहे आणि लवकरच हा विषाणु नाहीसा झाला असेल.
सीसीएमबीमधील शास्त्रज्ञ दिव्या तेज सोवपाती यांनी याबाबत ट्वीट केले की SARS-CoV-2चा उत्परिवर्तीत विषाणु N44OK लवकरच नाहीसा होईल अशी चिन्हे आहेत.
त्यांनी अशी देखील माहिती दिली आहे की, पहिल्या लाटेत N44OK या उत्परिवर्तनाने हैदोस घातला होता. परंतु आता दुसऱ्या लाटेला B1617 आणि B117 ही उत्परिवर्तने जबाबदार आहेत.
कोविड विषाणुमध्ये सातत्याने बदल होत राहिल्याने, आणि प्रत्येक बदलानंतर त्याची वाढ झाल्याने जगात कोविडची एकूण किती उत्परिवर्तने आहेत हे सांगणे अवघड असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.