33 C
Mumbai
Wednesday, October 23, 2024
घरदेश दुनियाइस्रायलकडून भारताला वैद्यकीय मदत

इस्रायलकडून भारताला वैद्यकीय मदत

Google News Follow

Related

भारताचा मध्य आशियातील मित्र इस्रायलने या कोविड महामारीचा सामना करण्यासाठी भारताला विविध प्रकारची वैद्यकीय मदत पुरवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद, आरोग्य मंत्रालय, आर्थिक मंत्रालय यांच्यासोबत तेल-अवीवमधील भारतीय दूतावास आणि नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाचे सहकार्य मिळत आहे. येत्या आठवड्यभरात विविध विमानांच्या माध्यमातून ही सर्व मदत साहित्य भारतात दाखल होईल.

जगभरात सध्या कोविडची दुसरी लाट सुरु असून भारतही त्याला अपवाद नाही. भारतात सध्या दिवसागणिक लाखो रुग्ण या कोविडच्या कचाट्यात येत आहेत. या सार्यामुळेच भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. पण या कठीण काळात भारताची मित्र राष्ट्रे मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. कोणी ऑक्सिजनचे सिलेंडर्स पाठवत आहेत, कोणी लस पाठवत आहे तर कोणी व्हेन्टिलेटर्सचा पुरवठा करत आहेत.

हे ही वाचा:

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य

७ किलो युरेनियमसह दोघांना अटक, एटीएसची कारवाई

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या गाडीवर हल्ला

सत्ताधारी पक्ष ते प्रमुख विरोधी पक्षही नाही, काँग्रेसची अधोगती सुरूच…

अशातच आता भारताचा जवळचा मित्र असणारा इस्रायलही भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. भारताला इस्रायलकडून हजारो वैयक्तिक किंवा सामुहिक वापरासाठी असलेले ऑक्सिजन जनरेटर, श्वसनाला मदत करणारे रेस्पिरेटर, औषधं आणि वैद्यकीय सामग्री या गोष्टींचा पुरवठा केला जाणार आहे. या संबंधी बोलताना इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गाबी अश्कनाझी म्हणाले, ”भारत हा आमच्या सगळ्यात जवळच्या आणि महत्त्वाच्या मित्र देशांपैकी एक आहे. भारतातील संकटाच्या या प्रसंगी इस्रायल भारतासोबत असून आमच्या भारतीय बंधु आणि भगिनींसाठी आयुष्य वाचवणारी वैद्यकीय उपकरणे आणि अन्य प्रकारची मदत पाठवत आहे. भारत आणि इस्रायलमधील संबंध सामरिक भागीदारीच्या स्वरुपाचे असून त्यात राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे.”

या संयुक्त मदत कार्यात इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाची आर्थिक संबंध शाखा, इस्रायल-भारत चेंबर ऑफ कॉमर्स, द इस्रायल-एशिया चेंबर ऑफ कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर्स असोसेशियन ऑफ इस्रायल, द फेडरेशन ऑफ इंडो-इस्रायली चेंबर्स ऑफ कॉमर्स, द इस्रायल एक्सपोर्ट इन्स्टिट्यूट, द स्टार्ट अप नेशन सेंट्रल यांच्यासह भारतात काम करणाऱ्या कंपन्या सहभागी आहेत.

अमडॉक्स या कंपनीने १५० ऑक्सिजन जनरेटर देण्याचे घोषित केले आहे. ज्युईश जॉइंट डिस्ट्रिब्युशन कमिटी ऑक्सिजन सिलेंडर पुरवणार आहे. तर मुंबईचे केईएम हॉस्पिटल, पनवेलचे महात्मा गांधी हॉस्पिटल आणि अहमदाबादच्या सरदार पटेल हॉस्पिटलला व्हेन्टिलेटर्स पुरवले जाणार आहेत.

या आधी कोरोना महामारीच्या सुरुवातीला भारताने इस्रायलला मास्क, पीपीई किट आणि औषधं बनवण्यासाठी कच्चा माल पुरवला होता, तसेच भारतात रहाणाऱ्या इस्रायली नागरिकांना परत पाठवण्यातही सहकार्य केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा