बंगालमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर उसळलेल्या जबरदस्त हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रायलयाचे एक पथक बंगालमध्ये दाखल झाले आहे. या पथकात चार सदस्यांचा समावेश असून अतिरिक्त सचिव पदाच्या तोडीच्या अधिकाऱ्याकडे या पथकाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
बंगालमध्ये २९४ जागांसाठी विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. परंतु त्यानंतर संपूर्ण बंगालमध्ये भयंकर हिंसाचार उफाळला आहे. अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्ते, कार्यालये यांच्यावर हल्ले करण्यात आले. या हिंसाचारात अनेक कार्यकर्त्यांनी प्राण देखील गमावले आहेत. भाजपा कार्यालयांची तोडफोड देखील करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्रायलयाने चार जणांचे एक पथक बंगालमध्ये रवाना केले आहे.
हे ही वाचा
मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य
७ किलो युरेनियमसह दोघांना अटक, एटीएसची कारवाई
मुंबईतील सोसायट्यांमधील लसीकरणाचे निकष…
सत्ताधारी पक्ष ते प्रमुख विरोधी पक्षही नाही, काँग्रेसची अधोगती सुरूच…
बंगालचे राज्यपाल श्री जगदीप धंखर यांनी याबाबत गृहसचिवांकडे अहवाल देखील मागितला. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली होती. या हिंसाचाराचा भाजपाने मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला. त्यासाठी काल देशभर धरणे आंदोलन देखील करण्यात आले. कोविडचे संपूर्ण निर्बंध पाळून ही आंदोलने झाली. बंगालमध्ये सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा बल तैनात करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. त्याबरोबरच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सुद्धा जातीने बंगामध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते.