25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषदिल्लीत भाजपची पहिली यादी जाहीर

दिल्लीत भाजपची पहिली यादी जाहीर

केजरीवाल यांच्याविरोधात परवेश वर्मा मैदानात

Google News Follow

Related

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पक्षाने आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात परवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने करोलबागमधून दुष्यंत गौतम, राजौरी गार्डनमध्ये मनजिंदर सिंग सिरसा, बिजवासनमध्ये कैलाश गेहलोत आणि गांधी नगरमध्ये अरविंदर सिंग लवली यांना उमेदवारी दिली आहे.

७० सदस्यीय दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी २९ उमेदवारांच्या यादीत भाजपने कालकाजी येथील माजी खासदार रमेश बिधुरी यांचे मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात नाव दिले आहे. पक्षाने जनकपुरीत आशिष सूद यांना उमेदवारी दिली आहे. दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष सतीश उपाध्याय मालवीय नगरमधून निवडणूक लढवणार आहेत.

हेही वाचा..

बायडन यांच्या पत्नीला पंतप्रधान मोदींकडून मिळालेला हिरा ठरला सर्वात महागडी भेट

बांगलादेशातील पाच बेकायदेशीर स्थलांतरितांना दिल्लीतून अटक

डीएमके मंत्री दुराई मुरुगन यांच्या निवासस्थानावर ईडीकडून ११ तास छापेमारी

आजपासून १५ वी लक्ष्य कप नेमबाजी स्पर्धा

भाजपने आदर्श नगरमध्ये राजकुमार भाटिया, बदलीमध्ये दीपक चौधरी, रिठाळामध्ये कुलवंत राणा, नांगलोई जाटमध्ये मनोज शोकीन, मंगोलपुरीमध्ये राजकुमार चौहान आणि रोहिणीमध्ये विजेंद्र गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने शालीमार बागेत रेखा गुप्ता, पटेल नगरमध्ये राज कुमार आनंद, राजौरी गार्डनमध्ये सिरसा, जंगपुरामध्ये तरविंदर सिंग मारवाह, आरके पुरममध्ये अनिल शर्मा, महरौलीमध्ये गजेंद्र यादव, छतरपूरमध्ये कर्तारसिंग तन्वर यांची नावे निश्चित केली आहेत.

भाजपने आंबेडकर नगरमध्ये कुशीराम चुनार, पटपरगंजमध्ये रवींद्र सिंह नेगी, विश्वास नगरमध्ये ओमप्रकाश शर्मा, कृष्णा नगरमध्ये अनिल गोयल, सीमापुरीमध्ये कुमारी रिंकू, रोहतास नगरमध्ये जितेंद्र महाजन आणि घोंडामध्ये अजय महावर यांना उमेदवारी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा