26 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरविशेषतिरंगा यात्रेतील चंदन गुप्ता हत्याप्रकरणात सर्व २८ आरोपींना जन्मठेप!

तिरंगा यात्रेतील चंदन गुप्ता हत्याप्रकरणात सर्व २८ आरोपींना जन्मठेप!

५० हजाराचा दंडही ठोठावला 

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील कासगंज येथील चंदन गुप्ता हत्याकांडप्रकरणी लखनऊच्या एनआयए विशेष न्यायालयाची सुनावणी पार पडली. शुक्रवारी (३ जानेवारी) न्यायालयाने सर्व २८ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोषींना ५०,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दरम्यान, यापूर्वी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषींमध्ये वसीम जावेद, नसीम जावेद, मोहम्मद जाहिद कुरैशी उर्फ जाहिद उर्फ जग्गा, आसिफ कुरैली उर्फ हिटलर, असलम कुरैशी, अकरम, तौफीक, खिल्लन, शवाब अली खान, राहत, सलमान, मोहसिन, आसिफ जिमवाला, साकिब, बबलू, नीशू उर्फ जीशान, वासिफ, इमरान, शमशाद, जफर, साकिर, खालिद परवेज, फैजान, इमरान, साकिर, मोहम्मद आमिर रफी, सलीम और मुनाजिर रफी यांचा समावेश आहे. यापूर्वी एनआयए कोर्टाने नसरुद्दीन आणि असीम कुरेशी यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती.

न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी आरोपींना खून, खुनाचा प्रयत्न, दंगल आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले. न्यायालयाच्या निर्णयानंतर या आरोपींना न्यायालयीन कोठडीत घेऊन त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या या कलमांव्यतिरिक्त सलीम, वसीम, नसीम, ​​मोहसीन, राहत, बबलू आणि सलमान यांना शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. घटनेच्या वेळी हे शस्त्रे बाळगत होते.

हे ही वाचा : 

छत्तीसगडमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

रोहित शर्मा टीममधून बाहेर, काय म्हणाला, ऋषभ पंत?

मी स्वतःसाठी काचेचा महाल नाही, तर गरिबांना घरे बांधली!

काश्मीरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी कटिबद्ध

दरम्यान, २६ जानेवारी २०१८ रोजी विश्व हिंदू परिषद, एबीव्हीपी आणि हिंदू वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा यात्रा काढली होती. ज्यामध्ये १०० हून अधिक लोकांनी तिरंगा घेवून सहभाग नोंदवला होता. मिरवणूक तहसील रोडवरील जीजीआयसीच्या गेटजवळ येताच सलीम, वसीम, नसीम आदींच्या टोळक्याने रस्ता अडवून मिरवणूक रोखली.

यावर चंदन गुप्ता याने आक्षेप घेतल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि या आरोपींनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांवर दगडफेक आणि गोळीबार केला. मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या सलीमने चंदन गुप्तावर गोळीबार केला, त्यात चंदन जखमी झाला. चंदनचा भाऊ आणि इतर साथीदारांनी त्याला कासगंज पोलीस ठाण्यात नेले तेथून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा