26 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरक्राईमनामाछत्तीसगडमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

गुप्त माहितीच्या आधारे सुरू होती शोधमोहीम

Google News Follow

Related

छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यातील इंदगाव पोलीस ठाणे परिसरातील सोरनामल जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या शोध मोहिमेसाठी एकूण ३०० जवान होते. गुप्तचर माहितीच्या आधारे ही शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. यात आतापर्यंत तीन नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी पोलीस अधीक्षकांनी केली आहे.

तसेच बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेंद्रा- पुन्नूर जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरून एकूण १२ बोअरच्या दोन बंदुका, नक्षलवादी गणवेश, साहित्य, स्फोटके आणि इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. याआधी बुधवारी विमला चंद्र सिडाम उर्फ तारक्का यांच्यासह तब्बल ११ नक्षलवाद्यांवर महाराष्ट्रातील गडचिरोली पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पण केले. त्यांच्या डोक्यावर एकूण एक कोटींहून अधिक रक्कम होती. छत्तीसगड सरकारने त्यांच्यावर बक्षीसही जाहीर केले होते.

अलीकडेच छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आणण्याबाबत विश्वास व्यक्त केला होता. तेव्हापासून संपूर्ण छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील कारवाया तीव्र झाल्या आहेत. जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण २५७ नक्षलवादी मारले गेले. ८६१ पकडले गेले आणि ७८९ नक्षलवादी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परतले.

हे ही वाचा : 

आनंद महिंद्रा म्हणतात, महाकुंभाला माझ्या हृदयात विशेष स्थान !

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; सहा महिन्यात वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक

कर्नाटकात बस भाडेवाढ, आता पत्नीसाठी बस मोफत, पतीला दुप्पट भाडे!

रेल्वे रुळावर पडला होता लोखंडी दरवाजा; रेल्वे उलटवण्याचा होता कट!

याशिवाय, मृत्यू दर २०१० मधील १००५ च्या सर्वोच्च पातळीवरून ९० टक्क्यांनी घटून सप्टेंबर २०२४ पर्यंत ९६ टक्क्यांवर आला आहे. २०२२ मध्ये, चार दशकांनंतर प्रथमच, मृत्यूची संख्या १०० पेक्षा कमी नोंदवली गेली आहे. तसेच, मुख्य १४ नक्षलवादी नेत्यांना तटस्थ करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा