31 C
Mumbai
Wednesday, October 23, 2024
घरदेश दुनियाकॅनडामध्ये लहानमुलांचेही लसीकरण चालू

कॅनडामध्ये लहानमुलांचेही लसीकरण चालू

Google News Follow

Related

कोरोना महामारीने जगाला पछाडलं आहे. मात्र यावर आता लसींच्या रुपाने उत्तर उपलब्ध झाले आहे. भारतासह अनेक देशांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यास सुरूवात केली आहे. कॅनडाने आता लहान मुलांना देखील लस देण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे कॅनडातील १२ ते १५ वयोगटातील मुलांना देखील ही लस देण्यात येणार आहे. यासाठी कॅनडाच्या आरोग्य विभागाने फायझरच्या लसीला मान्यता दिली आहे.

कॅनडामध्ये १६ व त्या वरील वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. कॅनडाच्या आरोग्य विभागाच्या मुख्य आरोग्य सल्लागार सुप्रिया शर्मा यांनी बुधवारी याला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे मुलांना सामान्यपणे आयुष्य जगण्याची संधी मिळणार आहे.

हे ही वाचा:

शोपियानमध्ये तीन घुसखोरांचा खात्मा

पुनावाला यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करा

माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे कोरोनामुळे निधन

आरक्षणाची जबाबदारी ढकलायला मुख्यमंत्र्यांचा लाईव्हचा खटाटोप

अमेरिकेत आता १२ ते १५ या वयोगटाचे लसीकरण होण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्याभरात या वयोगटासाठी विकसित करण्यात आलेल्या लशीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने दिली. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी बहुतांशी मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. करोनाच्या संसर्गाशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेत लसीकरण वेगाने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकन औषध निर्मिती कंपनी फायजरने ही १२ ते १५ या वयोगटासाठी करोना लस विकसित केली आहे. मार्च महिन्याच्या अखेरिस फायजरने १२ ते १५ वर्ष या वयोगटातील २२६० स्वयंसेवकांची लस चाचणी केली होती. या चाचणीत लस घेतलेल्या मुलांमध्ये कोविडची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. या चाचणीत सहभागी झालेल्या बालकांना लस घेतल्यानंतर प्रौढांसारखेच दुष्परिणाम जाणवू लागले होते. यामध्ये थंडी वाजणे, थकवा येणे, ताप येणे आदी लक्षणे जाणवली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा