27 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरक्राईमनामा‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचीर बालाजींच्या मृत्यूचे कारण हत्या की आत्महत्या?

‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचीर बालाजींच्या मृत्यूचे कारण हत्या की आत्महत्या?

बालाजी यांच्या आईची एफबीआय चौकशीची मागणी

Google News Follow

Related

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या ऑपरेशन्स आणि पद्धतींबद्दल चिंता व्यक्त करणारे २६ वर्षीय माजी ओपनएआय संशोधक सुचीर बालाजी हे सॅन फ्रान्सिस्को येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. तपासात कुठलाही गैरप्रकार झाल्याचे पुरावे मिळालेले नसून, ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. दरम्यान, सुचीर बालाजी यांच्या आईने त्यांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी बालाजी यांच्या मृत्यूला हत्या म्हणत एफबीआयकडून चौकशीची मागणी केली आहे.

सुचीर यांची आई पूर्णिमा राव यांनी सांगितले की, त्यांनी एका खाजगी तपासनीसाची नेमणूक केली आणि मृत्यूचे खरे कारण निश्चित करण्यासाठी दुसरे शवविच्छेदन केले. खासगी शवविच्छेदन अहवाल हा पोलिसांनी दिलेल्या मृत्यूच्या कारणाची पुष्टी करत नाही. बाथरुममध्ये चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या आणि रक्ताचे डाग पाहता त्याला कोणीतरी बाथरूममध्ये मारल्याचे समजून येते. सॅन फ्रान्सिस्को शहरातील लॉबिंग आम्हाला न्याय मिळण्यापासून थांबवू शकत नाही. आम्ही एफबीआय चौकशीची मागणी करत आहोत,” असे ट्विट त्यांनी केले आहे.

दुसरीकडे, एक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्याशी एलॉन मास्क यांचा दीर्घकाळ वाद सुरू आहे. सुचीर यांच्या आईच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना मस्क म्हणाले की, आत्महत्या केल्यासारखे वाटत नाही. यामुळे नवा वाद उभा राहिला आहे.

हे ही वाचा : 

जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात अडीच कोटी भाविक राम लल्लाचे दर्शन घेणार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, नोबेल पुरस्कार विजेते जिमी कार्टर यांचे निधन

बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून हिंदू व्यक्तीची हत्या, घराबाहेरील झाडावर लटकवले!

मौलाना बरेलवी म्हणतात, नवे वर्ष साजरे करणे हा इस्लाममध्ये गुन्हा

माहितीनुसार, सुचीर यांचा मृत्‍यू २६ नोव्‍हेंबर रोजी झाला मात्र, १४ डिसेंबर रोजी ही घटना उघडकीस आली होती. सुचीर बालाजी बरेच दिवसांपासून घराबाहेर पडले नव्हते. शिवाय ते त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांच्या फोन कॉललाही उत्तर देत नव्हते. सुचीरचे मित्र आणि सहकारी त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले असता त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. पुढे अधिकाऱ्यांना बालाजी यांचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर २६ नोव्हेंबरला त्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली.

सुचीर बालाजी यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये ओपनएआयमधून राजीनामा दिला होता. त्‍यांनी कंपनीवर कॉपीराइट उल्लंघनाचे गंभीर आरोप केले होते. चॅटजीपीटी सारख्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचे नुकसान होत आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा