24.3 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरधर्म संस्कृतीमौलाना बरेलवी म्हणतात, नवे वर्ष साजरे करणे हा इस्लाममध्ये गुन्हा

मौलाना बरेलवी म्हणतात, नवे वर्ष साजरे करणे हा इस्लाममध्ये गुन्हा

काढला फतवा, मुस्लिमांना दिला इशारा

Google News Follow

Related

नव्या वर्षाच्या स्वागताला सगळे सज्ज झालेले असताना आता ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी फतवा काढत नव्या वर्षात कुणालाही शुभेच्छा देऊ नका असे आवाहन मुस्लिमांना केले आहे.

वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या  शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी हा वादग्रस्त फतवा काढला आहे. त्यात ते म्हणतात की,  इस्लाममध्ये अशा शुभेच्छा देणे आणि कार्यक्रम आयोजित करणे गुन्हा आहे. नवीन वर्षांचा जल्लोष कशाला करायचा, ती काही अभिमानाची गोष्ट नाही. या दिवशी एकमेकांना कुणीही शुभेच्छा देऊ नका. हा ख्रिश्चन धर्मियांचा सण आहे. मुस्लिमांसाठी अशा शुभेच्छा देण्यास सक्त मनाई आहे. इस्लाममध्ये नृत्य आणि गाणे पूर्णपणे हराम आहे. शरियतनुसार हे काम गुन्हेगारांचे असल्यामुळे मुस्लिमांना नववर्ष साजरे करू नये.

मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी फतव्यात म्हटले आहे की, नवीन वर्षाची सुरुवात जानेवारीपासून होत असली तरी हा बिगर मुस्लिमांचा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यामुळे मुस्लिमांनी नवीन वर्ष साजरे करणे हे उचित नाही. शरियानुसार नवीन वर्ष साजरे करणे, नाचणे, गाणे, फटाके फोडणे, शुभेच्छा देणे कायद्याला धरून नाही.

हे ही वाचा:

संजय राऊत बोलतात त्याच्या नेमके उलटे घडते!

संविधान, महाकुंभ, मलेरियाचा पराभव आणि कॅन्सरवर उपचार!

दिल्लीत सापडले ८ बांगलादेशी नागरिक, बांगलादेशला रवानगी!

दक्षिण कोरियाच्या विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू!

ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी म्हटले आहे की, नवीन वर्षाच्या कार्यक्रमात मुस्लीम सहभागी होतात, ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी अशा कार्यक्रमांपासून लांब असायला हवे. जर कोणी असे वर्तन करत असेल तर त्याला गुन्हेगार म्हणायला हवे. त्यामुळे मुस्लीम समाजाने अशा कार्यक्रमात सहभागी होऊन गुन्हेगार होऊ नये.

दरम्यान, सुफी फाऊंडेशनने या फतव्याला विरोध केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कशिश वारसी यांनी रिझवी यांच्या या फतव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, रिझवी यांचा फतव्याचा कारखाना आहे. मुस्लिमांनी हे करू नये, त्यांनी असे करू नये, हे हराम आहे, ते हराम आहे, जे खरोखरच हराम आहे त्याला ते हराम म्हणणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा