उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील एका मंदिरात कट्टरपंथींनी देवी- देवतांच्या मूर्तींची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिव मंदिरातील मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मथुरा येथील नौझील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उदियादढी गावामध्ये ही घटना घडली. या ठिकाणी बांधलेल्या शिव मंदिरात काही तरुण घुसले आणि त्यांनी मूर्तींची विटंबना केली. तसेच या मूर्ती मंदिराबाहेर फेकण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मंदिरातील देवी- देवतांच्या फोटोंचीही तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान काहींनी यावेळी मनस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
माहितीनुसार, गुरुवार, २६ डिसेंबर रोजी मथुरा येथील नौझील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उदियादढी गावामध्ये बांधलेल्या मंदिरात काही तरुण घुसले. त्यांनी मंदिरावरील कळस, त्रिशूळ तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी मंदिरातील देवी- देवतांचे फोटो जाळण्यात आले. या प्रकारची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हे सर्व तरुण पळून गेले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
हे ही वाचा:
भारताचा मोठा दुश्मन हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू
मनमोहन सिंग एक दयाळू व्यक्ती, अभ्यासू अर्थतज्ञ आणि सुधारणांना समर्पित नेते म्हणून स्मरणात राहतील
दिल्ली विद्यापीठात हिंदू अभ्यासात पीएचडी कार्यक्रम सुरू होणार
“डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करताना बुद्धिमत्ता आणि विनम्रतेचे दर्शन घडायचे”
गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि घडलेल्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच आरोपींकडून तोडफोड करण्यात आलेल्या मूर्ती पुन्हा बनवण्यात आल्या आहेत. यावेळी घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.