बोलण्यात गुंतवून विद्यार्थ्यांचा मोबाईल आणि सोन्याची अंगठी चोरी करणाऱ्या ३० वर्षीय आरोपीला चेंबुर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अलिराज सय्यद असे अटक आरोपीचे नाव असून तो गोवंडी, शिवाजी नगरमधील रहिवासी आहे.
चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत राहात असलेला १६ वर्षीय मुलगा १९ डिसेंबरच्या सायंकाळी त्याच्या दोन मित्रांसोबत खासगी शिकवणीला गेला होता. सातच्या सुमारास पोस्टल कॉलनी रोडवरुन घरी परतत असताना आरोपी अलिराज याने तिन्ही विद्यार्थ्यांना रस्त्यात अडवले. आरोपी अलिराज याने विद्यार्थ्यांना बोलण्यात गुंतवून एका विद्यार्थ्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि एका मित्राचा मोबाईल फोन घेऊन पळ काढला.
हे ही वाचा:
नागपाड्यात पाण्याची टाकी फुटून ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यु
१७ बांगलादेशीयांना अटक, एटीएसची मुंबई,ठाणे पालघर जिल्ह्यात कारवाई
केजरीवाल यांची ‘महिला सन्मान योजना’ अस्तित्वातच नाही? दिल्ली सरकारनेचं केले स्पष्ट
अरविंद केजरीवाल यांची पुन्हा भविष्यवाणी
विद्यार्थ्यांनी घरी परतल्यावर कुटुंबियांना याबाबत सांगितले. कुटुंबियांनी मुलांना सोबत घेऊन चेंबूर पोलीस ठाण्यात जात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार, फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी अलिराज याला ताब्यात घेत अटक केली आहे.