घुसखोर बांगलादेशी विरोधात राज्य सरकारने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर राज्यातील तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबई, ठाणे नवीमुंबई आणि नाशिक जिल्ह्यात एकत्रित करण्यात आलेल्या कारवाईत १७ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या बांगलादेशीमध्ये महिलांचा समावेश असून हे मागील अनेक वर्षांपासून या जिल्ह्यामध्ये घुसखोरी करून राहत होते. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींची स्थानिक शहरांच्या पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोर बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या राहात असल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि नाशिक एटीएसच्या पथकाने बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती मिळवून विविध परिसरातून १७ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
हे ही वाचा:
नागपाड्यात पाण्याची टाकी फुटून ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यु
राहुल गांधी मस्साजोग न जाण्याची ही आहेत कारणे…
विनोद कांबळी म्हणाला, ही चूक पुन्हा होणार नाही!
केजरीवाल यांची ‘महिला सन्मान योजना’ अस्तित्वातच नाही? दिल्ली सरकारनेचं केले स्पष्ट
अटक करण्यात आलेल्या १७ बांगलादेशी नागरिकांमध्ये १४ पुरुष आणि ३ महिलाचा समावेश आहे. एटीएसने अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकाविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १० गुन्हे दाखल केले आहे.
पुढील तपासासाठी अटक बांगलादेशी नागरिकांना स्थानिक पोलिस ठाण्यांकडे सोपवण्यात आले आहे. एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे गेली अनेक वर्षांपासून बांगलादेशी नागरिक घुसखोरी करून राहत होते, स्थानिक पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.