माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज १०० वी जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी वाजपेयी यांच्या दिल्लीतील स्मारकाला भेट देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण करून एक लेख लिहिला आहे.
भारतामध्ये दरवर्षी २५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती म्हणून ‘सुशासन दिन’ साजरा केला जातो. भारतीय लोकांमध्ये सरकारमधील उत्तरदायित्वाबद्दल जागरूकता वाढवून पंतप्रधान वाजपेयी यांचा सन्मान करण्यासाठी २०१४ मध्ये सुशासन दिनाची स्थापना करण्यात आली होती. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती म्हणून आजही देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. १६ ऑगस्ट २०१८ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. २७ मार्च २०२५ रोजी त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
हे ही वाचा :
‘आदित्य ठाकरेंचे वय आहे तेवढीही त्यांना अक्कल नाही’
मुख्यमंत्र्यांचा खोटा व्हीडिओ टाकणे पडणार महाग! १२ प्रोफाईल विरोधात गुन्हा दाखल
दिल्लीत ‘बांगलादेश’वर बंदी; व्यापार करणार नाहीत!
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; १५ जणांचा मृत्यू
वाजपेयी हे देशातील पहिले गैर-काँग्रेस पंतप्रधान होते. अटलबिहारी वाजपेयी हे अनेक दशकांपासून भाजपचा एक मोठा चेहरा होते आणि पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले गैर-काँग्रेस पंतप्रधान होते.
१९७७ ते १९७९ या काळात त्यांनी पंतप्रधान मोराजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणूनही काम केले. १६ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
अटलबिहारी वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान राहिले आहेत. सर्वप्रथम ते १९९६ मध्ये १३ दिवसांसाठी पंतप्रधान झाले. बहुमत सिद्ध करू न शकल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर १९९८ मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याने १९९९ मध्ये १३ महिन्यांनी पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावेळी त्यांनी २००४ पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण केला.