बांगलादेशमध्ये सत्तापालट झाल्यापासून तेथील अल्पसंख्यांकांवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. तर, हिंदू मंदिरांनाही लक्ष्य केले जात आहे. भारतासह जगभरातून तेथील अल्पसंख्यांकांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दिल्लीतील काही व्यावसायिकांनी बांगलादेशवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांमुळे काश्मिरी गेट येथील ऑटो पार्ट्सच्या घाऊक विक्रेत्यांनी बांगलादेशसोबतच्या व्यापारावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
ऑटोमोटिव्ह पार्ट्स मर्चेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विनय नारंग म्हणाले, बांगलादेशातील हिंदूंवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ, काश्मिरी गेट ऑटो पार्ट्स मार्केटने शेजारील देशासोबत व्यवसाय न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे ते म्हणाले की, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले, आमची मंदिरे उद्ध्वस्त झाली आणि अनेक हिंदू बांधव मारले गेले. हे चुकीचे आहे, त्यामुळे आमच्या बाजाराने बांगलादेशसोबतचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, बांगलादेश हा विकसनशील देश आहे. सुमारे दोन हजार दुकानांनी बांगलादेशला निर्यात करणे बंद केले आहे.
हे ही वाचा :
मुख्यमंत्र्यांचा खोटा व्हीडिओ टाकणे पडणार महाग! १२ प्रोफाईल विरोधात गुन्हा दाखल
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; १५ जणांचा मृत्यू
भारतविरोधी दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता
मुलांना ‘सांताक्लॉज’ बनवण्यापूर्वी पालकांची परवानगी अनिवार्य अन्यथा होणार कारवाई!
दरम्यान, युनूस सरकारमधील परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार डॉ तौहीद हुसैन यांनी २३ डिसेंबर रोजी डिप्लोमॅटिक नोट पाठवताना मागणी केली आहे की, हसीना यांचे प्रत्यार्पण करावे. हसीना शेख आणि त्यांच्या लोकांविरुद्धच्या ६० हून अधिक तक्रारींमध्ये नरसंहाराचाही समावेश आहे. या तपासासाठी बांगलादेश सरकारला हसीना आणि अवामी लीगच्या अनेक नेत्यांना अटक करायची आहे. त्यामुळे भारताने त्यांना सहाय्य करावे अशी बांगलादेशची अपेक्षा आहे.