शिंदे सरकारने काढलेल्या ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेमध्ये माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मलई खाल्ली असा आरोप उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. आदित्य ठाकरेंच्या टीकेला माजी मंत्री शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘आदित्य ठाकरेंचे वय आहे तेवढीही त्यांना अक्कल नाही’, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.
‘एक राज्य एक गणवेश’ हा कार्यक्रम जो मिंदे सरकार राबवणार होते तो निर्णय या सरकारने बंद केला. मग आता त्या मंत्र्याची चौकशी होणार का?, दीपक केसरकर यांनी शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश देखील सोडला नाही, त्यात देखील मलई खाण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. याबाबत त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांसाठी वापरला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
यावर प्रत्युत्तर देताना केसरकर म्हणाले, ‘आदित्य ठाकरेंचे वय आहे तेवढीही त्यांना अक्कल नाही’. गणवेशाचे कंत्राट १३८ कोटीचे होते ते ११ कोटी रुपये कमी करण्यात आले. तर यामध्ये कोणाला काय मिळेल. महापालिकेमुळे करोडो रुपये ज्यांच्याकडे येतात, त्यांना हे खोके बोलतात. जेव्हा थोडे पैसे येतात तेव्हा हे मलाई बोलतात. त्यामुळे यांना ही सवय लागली आहे. आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनचे तुकडे झाले, असे दीपक केसरकर म्हणाले.
हे ही वाचा :
दिल्लीत ‘बांगलादेश’वर बंदी; व्यापार करणार नाहीत!
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; १५ जणांचा मृत्यू
मुख्यमंत्र्यांचा खोटा व्हीडिओ टाकणे पडणार महाग! १२ प्रोफाईल विरोधात गुन्हा दाखल