28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाभारतविरोधी दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता

भारतविरोधी दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता

उच्च न्यायालयाने दिला निर्णय

Google News Follow

Related

बांगलादेशातील एका न्यायालयाने एका भारतविरोधी दहशतवादी आरोपीला दिलासा दिला आहे. मंगळवारी, माजी कनिष्ठ मंत्री आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) सदस्य, अब्दुस सलाम पिंटू, ज्याने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि बांगलादेशमधील दहशतवाद्यांना आर्थिक मदत केली त्याला १७ वर्षांनंतर तुरुंगातून मुक्त केले आहे. अब्दुस सलामने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामीला (HuJI) भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्यासाठी मदत केली होती. २००४ मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर ग्रेनेड हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

अब्दुस सलामने पीओकेमधील शिबिरांमध्ये HuJI च्या मोहिमांमध्ये शस्त्रास्त्रांची खरेदी, भरती आणि प्रशिक्षण कार्यक्रमांना मदत करून भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याच्यावर HuJI मदरशाच्या विद्यार्थ्यांना बंदुक आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देण्यास मदत केल्याचा आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी निधी आणि शस्त्रे गोळा करण्याचा आरोप आहे. पाकिस्तानस्थित HuJI या संघटनेला केवळ भारतातच नाही तर बांगलादेश, इस्रायल, न्यूझीलंड, ब्रिटन आणि अमेरिकेमध्येही दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.

माहितीनुसार, अब्दुसची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २००८ सालापासून तो कैदेत होता. अब्दुस यांच्याप्रमाणेचं बीएनपीचे आणखी एक माजी मंत्री, लुफ्तोज्जमान बाबर यांना गेल्या आठवड्यात निर्दोष सोडण्यात आले होते. २००४ मध्ये हसीना शेख यांच्या हत्येच्या प्रयत्नात ते सामील होते.

२००४ च्या ग्रेनेड हल्ल्याच्या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने २०२१ मध्ये ढाका न्यायालयात सांगितले की, बंदी घातलेल्या HuJI ला मदत करणाऱ्या अब्दुस सलाम पिंटूने या संघटनेला भारताविरुद्ध वापरण्यासाठी शस्त्रे खरेदी करण्यास मदत केली होती. २०११ मध्ये तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला असेही सांगितले की, अब्दुस आणि बाबर यांनी अनेक तरुणांना, प्रामुख्याने मदरशातील विद्यार्थ्यांना, बंदुक आणि बॉम्ब हाताळण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यांनी म्हटले होते की हसीना यांना संपवणे हे HuJI चे उद्दिष्ट आहे. HuJI ने भारतात दहशतवादी हल्ल्यांची मालिका घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये अनेक कमी- तीव्रतेचे हल्ले समाविष्ट आहेत, जसे की वाराणसीमध्ये २००६ मध्ये कोर्ट कॉम्प्लेक्स बॉम्बस्फोट, २००७ मध्ये अजमेर शरीफ दर्ग्यावर बॉम्बस्फोट आणि २०११ मध्ये दिल्लीत स्फोट.

हे ही वाचा : 

मुलांना ‘सांताक्लॉज’ बनवण्यापूर्वी पालकांची परवानगी अनिवार्य अन्यथा होणार कारवाई!

हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील

“पूर्वीच्या बीडच्या पालकमंत्र्यांनी त्यांचे पालकमंत्री पद भाड्याने दिले होते”

दिल्लीतील इमिग्रेशन रॅकेटचा पर्दाफार्श; ११ जणांना घेतले ताब्यात

HuJI ला लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) सारख्या इतर दहशतवादी गटांच्या सहकार्याने काम करण्यासाठी ओळखले जाते आणि त्यांना पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) कडून पाठिंबा आणि संरक्षण मिळते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा