शिक्षणतज्ज्ञ आणि आम आदमी पक्षात नुकताच प्रवेश केलेले अवध ओझा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अवध ओझा यांनी आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची देवतांशी केली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल हे कृष्णाचा अवतार असल्याचा दावा ओझा यांनी केला आहे.
“अरविंद केजरीवाल हे नक्कीच देव आहेत. ते कृष्णाचा अवतार असल्याचे मी आधीच सांगितले आहे. जेव्हा जेव्हा कोणी समाज बदलण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा जेव्हा ते गरिबांसाठी मसिहा बनण्याचा प्रयत्न करतात तेव्हा समाजातील कंस त्यांच्या मागे लागतात,” असे वक्तव्य अवध ओझा यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना केले.
पुढे अवध ओझा यांनी म्हटले की, “समाजातील कंस लोकांना असं वाटत नाही की, मसिहाने गरीब आणि दलितांसाठी काम करावे असे वाटत नाही. आज दिल्लीची स्थिती संपूर्ण देशासाठी उदाहरण बनत आहे. अरविंद केजरीवाल २०२९ मध्ये पंतप्रधान होण्याच्या संभाव्यतेबद्दल प्रत्येकजण घाबरला आहे. मला शंका नाही की, ते भगवान आहेत, त्यांनी शिक्षण मोफत केले,” ओझा म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Delhi: Aam Aadmi Party's candidate Avadh Ojha says, "Arvind Kejriwal is certainly like a god. I have always said that he is the incarnation of Krishna. Whenever someone tries to bring change in society, especially when they try to become a messiah for the poor, the societal… pic.twitter.com/3pD5oaJkv5
— IANS (@ians_india) December 24, 2024
हे ही वाचा:
“पूर्वीच्या बीडच्या पालकमंत्र्यांनी त्यांचे पालकमंत्री पद भाड्याने दिले होते”
गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरशी संबंधित ठाण्यातील फ्लॅट जप्त
दिल्लीतील इमिग्रेशन रॅकेटचा पर्दाफार्श; ११ जणांना घेतले ताब्यात
बीकेआय प्रतिबंधित दहशतवादी गटाला शस्त्र पुरवठा करणाऱ्याला मुंबईत ठोकल्या बेड्या
अवध ओझा हे पटपरगंज मतदारसंघातून अपच्या तिकिटावर आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी हा मतदारसंघ दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे होता. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपने जाहीर केलेल्या यादीत सिसोदिया यांना जंगापुरा जागेवरून संधी देण्यात आली आहे.