ख्रिसमसच्या निमित्ताने मुलांना अनेकदा सांताक्लॉजच्या वेशात शाळेत येण्यास सांगितले जाते. अनेक पालक आपल्या मुलांना सांताक्लॉज बनवण्यास सहमत असतात, परंतु काही पालक आपल्या मुलांना सांताक्लॉज बनवण्याचे टाळतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन मध्य प्रदेश सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये मुलांच्या पालकांना असे पोशाख घालण्यासाठी शाळा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे म्हटले आहे.
मध्य प्रदेश बाल हक्क संरक्षण आयोगाने ख्रिसमसच्या आधी शालेय शिक्षण विभागासह सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये लिहिले की, अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. पालकांच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना कोणताही विशिष्ट पोशाख घालण्यास सांगितले तर शाळा आणि संस्थेवर कारवाई केली जाईल.
हे ही वाचा :
हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील
“पूर्वीच्या बीडच्या पालकमंत्र्यांनी त्यांचे पालकमंत्री पद भाड्याने दिले होते”
दिल्लीतील इमिग्रेशन रॅकेटचा पर्दाफार्श; ११ जणांना घेतले ताब्यात
बँक लुटणारे दोन आरोपी चकमकीत ठार!
खरे तर, हिंदू संघटनांकडून बऱ्याच दिवसांपासून मागणी केली जात आहे की, ख्रिसमसच्या निमित्ताने पालकांच्या परवानगी शिवाय मिशनरी शाळांसह अनेक शाळा मुलांना सांताक्लॉज बनवले जाते. अशा परिस्थितीत बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अनुराग पांडे यांनी सूचना जारी केल्या आहेत. सूचनेमध्ये म्हटले की, “विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शाळांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या निवडक मुला-मुलींसाठी, विशेष पोशाख आणि इतर कोणतीही पात्रे बनवण्यासाठी शालेय संस्थेने मुला-मुलींच्या पालकांची लेखी परवानगी घ्यावी.
सुचनेनुसार, कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणताही मुलगा/मुलगी या कार्यक्रमात सहभागी होता कामा नये, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अप्रिय परिस्थिती निर्माण होईल. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा वाद निदर्शनास आल्यास, संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार शाळा/संस्थेवर कारवाई केली जाईल, ज्याला सर्वस्वी शाळा जबाबदार असेल.