23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारण“पूर्वीच्या बीडच्या पालकमंत्र्यांनी त्यांचे पालकमंत्री पद भाड्याने दिले होते”

“पूर्वीच्या बीडच्या पालकमंत्र्यांनी त्यांचे पालकमंत्री पद भाड्याने दिले होते”

आमदार सुरेश धस यांचा बीड हत्या प्रकरणावरून खोचक टोला

Google News Follow

Related

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देत एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार असल्याची घोषणा केली. यावर बीडचे आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निवेदनाचे कौतुक करत बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असं म्हटलं आहे.

“विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं. त्यांच्या निर्णयापुढे किंवा निवेदनापुढे जाणारा मी कोण? इतकं सकारात्मक निवदेन कुठल्याही गृहमंत्र्याने किंवा मुख्यमंत्र्याने केलेलं नाही. आजपर्यंत कुठल्याही खुनाच्या घटनेत त्या कुटुंबाला मदत झालेली नाही. मोक्का लावतो हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या एसपींनी कोणा आकाचं ऐकून अराजकता माजवलेली, त्या एसपींना एका दिवसात हलवलं,” असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांच कौतुक केलं.

“बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारावा. अजित पवार झाल्यास हरकत नाही. मागच्या पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्री पद भाड्याने दिलं होतं,” असा खोचक टोला सुरेश धस यांनी नाव न घेता लगावला. पुढे ते म्हणाले की, आकाला मी घाबरत नाही. ९ तारखेला घटना घडली आणि आका त्याच परिसरात होता. आका ३०२ मध्ये देखील आहे. आका सध्या रिसॉर्ट बांधत आहे. शेतकऱ्यांना धमकी देऊन काम सुरू आहे. परळी येथील दुबे प्रकरणात देखील आका आहेत. किती लाखात मिटले मला माहीत आहे, असं सुरेश धस म्हणाले.

“संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना १५ दिवसांचा पीसीआर मिळाला ही समाधानाची बाब आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्याची संधी मिळेल. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही झाली. आयजी लेव्हलचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्देवी, घाणेरड्या घटनेचा तपास करणार आहेत. याची न्यायालयीन चौकशी होईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलय. प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यात नाही, तर राज्यभरात लोकांच्या मनात आहे. कोणाला ही घटना पटलेली नाही. बीड जिल्हा एकवटेल असं चित्र आहे,” असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरशी संबंधित ठाण्यातील फ्लॅट जप्त

दिल्लीतील इमिग्रेशन रॅकेटचा पर्दाफार्श; ११ जणांना घेतले ताब्यात

बीकेआय प्रतिबंधित दहशतवादी गटाला शस्त्र पुरवठा करणाऱ्याला मुंबईत ठोकल्या बेड्या

चित्रपटांसाठी १८ राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी असणारे श्याम बेनेगल यांची कारकीर्द कशी होती?

पुढे ते असंही म्हणाले की, “बीड जिल्ह्यात कायदा राहिला नाही. बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक होतील अशी अपेक्षा आहे. आरोपी विष्णू चाटे हा आकाच्या खालचा छोटा आका आहे. पोलिसांनी पकडलं असं वाटत नाही, ते स्वतः सरेंडर झाले आहेत. यातला आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे. हा आता १०० टक्के खंडणीचा गुन्हा राहिलेला नाही,” असा आरोप सुरेश धस यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा