लखनौमधील इंडियन ओव्हरसीज बँकेचे (IOB) लॉकर्स फोडून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या टोळीतील दुसरा बदमाश सनी दयाल यालाही पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. सोमवारी (२४ डिसेंबर) रात्री उशिरा गाझीपूरमधील यूपी-बिहार सीमेवर ही चकमक झाली. यापूर्वी लखनौमधील किसान पथावर सोविंद कुमारसोबत पोलिसांची चकमक झाली होती, ज्यामध्ये तो मारला गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूरमध्ये बिहार सीमेवर झालेल्या चकमकीत सनी दयाल मारला गेला. गहमर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारा पोलीस चौकीजवळ ही चकमक झाली. गाझीपूरचे एसपी इराज राजा यांनी बँक लुटण्यात सहभागी असलेल्या सनी दयालच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेचे लॉकर फोडून चोरीच्या गुन्ह्यात आतापर्यंत दोन गुन्हेगारांचा मृत्यू झाला असून, तीन गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे अद्याप फरार आहेत. मिथुन कुमार (२८) आणि विपिन कुमार यांना पकडण्यासाठी पोलिस सतत छापेमारी करत आहेत.
हे ही वाचा:
गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरशी संबंधित ठाण्यातील फ्लॅट जप्त
दिल्लीतील इमिग्रेशन रॅकेटचा पर्दाफार्श; ११ जणांना घेतले ताब्यात
बीकेआय प्रतिबंधित दहशतवादी गटाला शस्त्र पुरवठा करणाऱ्याला मुंबईत ठोकल्या बेड्या
चित्रपटांसाठी १८ राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी असणारे श्याम बेनेगल यांची कारकीर्द कशी होती?
पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी २२ ते २८ वर्षे वयोगटातील आहेत. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांची कार चिन्हाटच्या लौलाई गावाजवळ थांबली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “थांबायला सांगितल्यावर आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये एक आरोपी, अरविंद कुमार (२२) याच्या पायाला गोळी लागली. त्याच्यासोबत कारमध्ये असलेले बलराम , कुमार आणि कैलाश बिंद यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३ लाख रुपये रोख, १८८९ ग्रॅम सोने आणि १२४० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे.
बिहारमधील या टोळीतील सदस्यांनी २३ डिसेंबरच्या पहाटे चिन्हाट येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत भिंतीला अडीच फूट छिद्र पाडून प्रवेश केला होता. चोरट्यांनी ९० पैकी ४२ लॉकरमधून मौल्यवान वस्तू लुटल्या होत्या. या प्रकरणी पोलीसांचा अधिक तपास सुरु आहे.