22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाआईला धडक देणाऱ्या कार चालकाची मुलांनी केली हत्या

आईला धडक देणाऱ्या कार चालकाची मुलांनी केली हत्या

गुन्हा दाखल करत केली अटक

Google News Follow

Related

कारच्या धडकेत आईला दुखापत झाल्याने दोन मुलांनी निर्घृणपणे चाकूने सपासप वार करुन ३८ वर्षीय कार चालकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना गोवंडीतील करमण मामा नगरमध्ये घडली.

याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन शिवाजी नगर पोलिसांनी अब्दुल करीम शेख उर्फ दादू आणि मोहम्मद शरीफ अब्बास अली शेख उर्फ पप्पू यांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हे हत्याकांड घडले. गोवंडीतील करमण मामा नगरमध्ये कुटुंबासोबत राहात असलेले आदिल तालीम खान (३८) हे कारने जात असताना त्यांच्या कारची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीवर असलेली महिला जखमी झाली. आईला लागल्याच्या कारणावरून आरोपी दादू आणि पप्पू यांनी कार चालक आदिल खान यांच्याशी वाद घातला.

हे ही वाचा:

ताजमहालपेक्षा लोकांना भावतेय अयोध्येचे श्रीराममंदिर!

ठाण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २५ बांगलादेशींना अटक!

५ वी, ८ वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना नापास घोषित करण्यात येणार; ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द!

पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार; अंतरिम जामीनासाठीची याचिका फेटाळली

रात्री अकराच्या सुमारास दादू आणि पप्पू यांनी आदिल खान यांच्या घरी जात त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. आदिल खान हे गंभीर जखमी होऊन खाली कोसळताच दोघांनी तेथून पळ काढला. चाकू हल्ल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबियांनी हल्ल्याची माहिती पोलिसांना देत जखमी अवस्थेतील आदिल यांना उपचारांसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. पण, तोपर्यंत उशीर झाला होता.

डॉक्टरांनी आदिल यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आदिल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत तपास सुरू केला. पोलिसांनी आदिल यांची पत्नी शबिना (३४) यांची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १०३(१), ३३२(अ), ३(५) यासह महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१)(अ) आणि १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन घेत दादू आणि पप्पू यांना अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा