महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. कल्याण, उल्हासनगर, भिवंडी ही अशी शहरे आहेत जिथे मोठ्या संख्येने बांगलादेशी अवैधरित्या राहतात. ठाणे पोलीस शोध मोहीम राबवत अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशींना अटक करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (२३ डिसेंबर) पोलिसांनी २५ बांगलादेशींना अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, मानपाडा आणि भिवंडी येथून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे भारतात राहण्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्र सापडले नाही, त्यानंतर या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मानपाडा आणि भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या शहरांमध्ये बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी मोहीम राबवून बांगलादेशींना अटक केली. ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कबडणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे कागदपत्रे मागण्यात आली, मात्र त्यांनी कोणतेही कागदपत्र सादर केले नाही.
हे ही वाचा :
५ वी, ८ वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना नापास घोषित करण्यात येणार; ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द!
राहुल गांधी म्हणतात, सूर्यवंशी यांची हत्या दलित म्हणून…भातखळकर म्हणाले, ही तर गिधाडे!
भारताने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवावे!
पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार; अंतरिम जामीनासाठीची याचिका फेटाळली
कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी पती-पत्नीला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गेल्या सात वर्षांपासून ते कल्याणमध्ये राहत होते. पती एका कारवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता तर पत्नी बारमध्ये बारगर्ल म्हणून काम करत होती, असे पोलिसांनी सागितले.
सध्या बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींच्या विरोधात ठाणे पोलिसांची मोहीम सुरूच आहे. या कारवाईमुळे ठाणे जिल्ह्य़ातील पोलीस ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून आले.