गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाणे येथे पार पडणार आहे. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर लिखित ‘गानसरस्वती आदिशक्तीचा धन्योद्गार!’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून वाचनप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर लिखित ‘गानसरस्वती आदिशक्तीचा धन्योद्गार!’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. किशोरीताई अमोणकर यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. तसेच प्रकाशनानिमित्त लेखक दाजी पणशीकर यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे. ‘किशोरीताईंचे प्रातिभदर्शन आणि मी!’ या विषयावर हे व्याख्यान असणार असून शनिवार २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता ठाणे येथे रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची तारीख आणि वेळ: शनिवार, २८ डिसेंबर २०२४; सायंकाळी ५ वाजता
कार्यक्रमाचे ठिकाण: हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेव ठाकरे स्मारक, तीन हात नाका, इटरनिटी मॉल ते ज्ञानसाधना महाविद्यालय सेवा रस्ता, ठाणे (प.)
हे ही वाचा:
ट्रम्प टीममधील AI साठी वरिष्ठ धोरण सल्लागारपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन कोण आहेत?
मालेगाव व्होट जिहाद: मुंबईतील सहा बँकांमधून सिराज मोहम्मदसह बेनामी खात्यांमध्ये आले कोटी कोटी
पोलिसांशी झालेल्या चकमकीत खलिस्तान कमांडो फोर्स संघटनेचे तीन दहशतवादी ठार