राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज (२३ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्वतः भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत भेटीची माहिती दिली. या भेटीमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. समीर भुजबळही भेटीमध्ये सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. याच दरम्यान, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
हे ही वाचा :
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर लिखित ‘गानसरस्वती आदिशक्तीचा धन्योद्गार!’चे शनिवारी प्रकाशन
ट्रम्प टीममधील AI साठी वरिष्ठ धोरण सल्लागारपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन कोण आहेत?
मालेगाव व्होट जिहाद: मुंबईतील सहा बँकांमधून सिराज मोहम्मदसह बेनामी खात्यांमध्ये आले कोटी कोटी
पोलिसांशी झालेल्या चकमकीत खलिस्तान कमांडो फोर्स संघटनेचे तीन दहशतवादी ठार
पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीत सामाजिक-राजकीय गोष्टीं आणि सध्या काय घडत आहेत यावर चर्चा झाली. सध्या काय चालू आहे, याबाबत वर्तमान पत्र-इलेक्ट्रोनिक मिडीयाच्या माध्यमातून पाहिले आहे, वाचले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महायुतीला मिळालेला महाविजयात ओबीसीचे पाठबळ लाभले असल्याचे त्यांनी मान्य केले. हे सर्व लक्षात घेवून ओबीसीचे नुकसान होणार नाही याची काळजी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भुजबळ पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आश्वसन देत म्हटले, सध्या ५-६ दिवस शाळा-कॉलेजला सुट्ट्या आहेत. १०-१२ दिवसानंतर आपणा पुन्हा भेटू आणि निश्चितपणे आपण यातून मार्ग शोधून काढू.