बांगलादेशात हिंदुंवरील हिंसाचार सुरूच आहे. एकामागून एक हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. अत्याचारा विरोधात राज्यासह देशात निदर्शने चालू आहेत. कट्टरपंथीयांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. याच दरम्यान, बांगलादेशातील गैर हिंदुं रुग्णांवर उपचार करू नये, अशी भाजपकडून मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील मुकुंदपूर भागातील एका खाजगी रुग्णालयात भाजप कार्यकत्यांनी निदर्शेन केली. आंदोलकांनी रुग्णालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, देश प्रथम प्रथम येतो. बांगलादेशात आमच्या बंधू-भगिनींवर अत्याचार करून त्यांना ठार मारले जात आहेत. त्यामुळे अहिंदू बांगलादेशींना वैदकीय उपचार दिले जाऊ नयेत.
इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, रुग्णालयातून आंदोलकांनी म्हटले की, राष्ट्र आणि ध्वजाच्या सन्मानासाठी आपली नैतीकता आणि आपला व्यवसाय बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू बंधू-भगीनी यांच्यासोबत जे काही घडत आहे ते पाहून आम्ही दुःखी आहोत, त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या केली जात आहे. हे थांबवले पाहिजे. राष्ट्र नेहमी प्रथम येते.
हे ही वाचा :
वायनाडच्या बहिण भावाच्या विजयामागे जातीय मुस्लिम युती !
१९ वर्षांखालील महिलांच्या आशिया कपमध्ये भारत विजेता, त्रिशा चमकली!
संभलमध्ये ४६ वर्षांपासून बंद असलेल्या मंदिरात भंडारा, भाविकांची गर्दी उसळली!
घाटकोपरमध्ये पाण्याच्या टाकीत पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
दरम्यान, या महिन्याच्या सुरवातील कोलकाता येथील एका रुग्णालयाने जाहीर केले होते की, यापुढे बांगलादेशातील रुग्णांना दाखल करणार नाही. देशातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रध्वजाचा कथित अनादर केल्याच्या निषेधार्थ हे पाऊल उचलण्यात आल्याचे रुग्णालयाने म्हटले. भारतीय ध्वजाची विटंबना केल्याप्रकरणी अशीच भूमिका आणखी एका रुग्णालयाने केली होती.